शिवभोजनालय बनले गोरगरिबांसाठी अन्नपूर्णा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:17 AM2021-04-18T04:17:34+5:302021-04-18T04:17:34+5:30
लॉकडाऊन काळात हातावरची मजुरी असलेल्या अनेक गोरगरिबांच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी पूर्वी पाच रुपयांत मिळणारे शिवभोजन महाराष्ट्र शासनाकडून मोफत दिल्या ...
लॉकडाऊन काळात हातावरची मजुरी असलेल्या अनेक गोरगरिबांच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी पूर्वी पाच रुपयांत मिळणारे शिवभोजन महाराष्ट्र शासनाकडून मोफत दिल्या जात आहे. शहरात महिला बचत गटामार्फत बसस्थानकानजीक शिवभोजनालय उघडण्यात आले आहे. या शिवभोजनालयातून मोफत जेवण दिले जात असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी सांगितले होते. दरम्यान, सध्याच्या संचारबंदी काळात महाराष्ट्र शासनाने शिवभोजन मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे शिवथाळींची संख्या जास्त प्रमाणात नसतानाही गरजू लोकांना जेवणाचे वाटप करण्यात येत आहेत. शहरात शिवभोजनासाठी रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. भोजनालयातून कोणीही उपाशी जाणार नाही, याची पुरेपूर काळजी बचत गटाच्या महिला व शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे हे घेत आहेत. शिवथाळी योजनेची अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी गटविकास अधिकारी शिंदे, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी भेट दिली.