शिवराज्याभिषेक सोहळा; अकोलेकर सज्ज

By admin | Published: June 6, 2017 12:28 AM2017-06-06T00:28:03+5:302017-06-06T00:28:03+5:30

६ जून रोजी रायगडावर जमणार शिवभक्त

Shivrajyabhishek ceremony; Akolkar ready | शिवराज्याभिषेक सोहळा; अकोलेकर सज्ज

शिवराज्याभिषेक सोहळा; अकोलेकर सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्रातील तमाम शिवपे्रमींचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ६ जून (मंगळवार) रोजी किल्ले रायगडावर साजरा केल्या जाणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ््यासाठी अकोल्यातील शिवपे्रमी सज्ज झाले आहेत. रविवारी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवभक्त किल्ले रायगडावर गेले आहेत.
परकियांच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढून रयतेला स्वाभिमानाने जगणे शिकवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने हा सोहळा जगातील अप्रतिम अशा दुर्गराज रायगडावर साजरा केला जात आहे. या सोहळ््यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील शिवभक्तांसह इतिहास संशोधक, अभ्यासक, इतिहासपे्रमींची मांदियाळी जमणार आहे. याकरिता रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण सह्याद्रीच्या गडकोटांनी केले. छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारे असंख्य गडकिल्ले महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. गडकोटांचे जतन, संवर्धन व विकास होण्याची नितांत गरज आहे. या सर्व मुद्यावर सोहळ््यानिमित्त प्रकाशझोत टाकला जाईल. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने निधीची तरतूद केली असून, त्याचा विकास आराखडा तयार झाला आहे. हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवभक्त रविवारी किल्ले रायगडसाठी रवाना झाले आहेत.
रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा ‘राष्ट्रीय सण’ म्हणून युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी प्रबोधन सुरू केले आहे. परिणामी गतवर्षी विदर्भ, मराठवाडा, खान्देशातूनच नव्हे तर कर्नाटक, गुजरात, बडोदा आदी राज्यातून असंख्य शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते त्यामुळे हा उत्सव राष्ट्रीय सण घोषीत करावा अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.

Web Title: Shivrajyabhishek ceremony; Akolkar ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.