निवासी उपजिल्हाप्रमुख पदासाठी शिवसेनेत ‘लॉबिंग’

By admin | Published: October 22, 2016 02:42 AM2016-10-22T02:42:54+5:302016-10-22T02:42:54+5:30

मुंबईतून जाहीर होणार नाव

Shivsena's 'lobbying' for resident deputy chief | निवासी उपजिल्हाप्रमुख पदासाठी शिवसेनेत ‘लॉबिंग’

निवासी उपजिल्हाप्रमुख पदासाठी शिवसेनेत ‘लॉबिंग’

Next

अकोला, दि. २१- शिवसेनेच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदल केल्यानंतर निवासी उपजिल्हाप्रमुख पद रिक्त ठेवण्यात आले होते. पक्षात या पदासाठी नवीन चेहर्‍याला संधी देण्याच्या हालचाली सुरू होताच इच्छुकांनी वरिष्ठांची मनधरणी सुरू केली होती. येत्या दोन दिवसांत मुंबईतून निवासी उपजिल्हाप्रमुख पदासाठी संभाव्य दावेदाराचे नाव जाहीर केले जाणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीमध्ये पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी मोठय़ा प्रमाणात उलथापालथ केली. तब्बल अकरा वर्षांंनंतर सेनेची जिल्हा कार्यकारिणी पूर्णत: बदलण्यात आली. आगामी नगरपालिका व महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केलेला प्रयोग पक्षासाठी फायदेशीर ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना जिल्हाप्रमुख, चार उपजिल्हाप्रमुखांच्या नावाची घोषणा करण्यात आली. कार्यकारिणीतील निवासी उपजिल्हाप्रमुख पद मात्र रिक्त ठेवण्यात आले. सदर पद का रिक्त ठेवले, याबद्दल पक्षात चांगलीच चर्चा रंगली होती. तूर्तास या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. वरिष्ठ नेत्यांकडून निवासी उपजिल्हाप्रमुख पदासाठी दावेदाराचा शोध सुरू होताच अनेकांनी पक्षाकडे ह्यलॉबिंगह्ण सुरू केली. या पदासाठी नवीन चेहर्‍याला संधी दिली जाण्याची शक्यता असून, येत्या दोन दिवसांत संभाव्य नावाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे.

सर्वांंना सामावून घेण्याचा प्रयत्न
सेनेचे पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदल करीत अनेकांना आश्‍चर्याचे धक्के दिले. अकरा वर्षांंच्या कालावधीनंतर कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय पक्षासाठी नवसंजीवनी ठरण्याची चर्चा रंगली आहे. जिल्हा कार्यकारिणीत सर्वांंना सामावून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

Web Title: Shivsena's 'lobbying' for resident deputy chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.