अयोध्येसाठी शिवसेनेचा बिगुल; २३ नोव्हेंबरला होणार रवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:29 PM2018-11-05T13:29:10+5:302018-11-05T13:29:56+5:30

अकोला : अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा निर्धार व्यक्त करीत शिवसेनेने येत्या २३ नोव्हेंबर रोजी अयोध्येत दाखल होण्याचा बिगुल फुंकला. ...

Shivsena's voice for Ayodhya; Will be on 23rd November! | अयोध्येसाठी शिवसेनेचा बिगुल; २३ नोव्हेंबरला होणार रवाना!

अयोध्येसाठी शिवसेनेचा बिगुल; २३ नोव्हेंबरला होणार रवाना!

googlenewsNext

अकोला: अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा निर्धार व्यक्त करीत शिवसेनेने येत्या २३ नोव्हेंबर रोजी अयोध्येत दाखल होण्याचा बिगुल फुंकला. सेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत येत्या २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपावर शरसंधान साधत अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील असंख्य शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार आहेत. त्या पृष्ठभूमीवर शिवसेना जिल्हाप्र्रमुख नितीन देशमुख यांनी नियोजन करण्यासाठी रविवारी स्थानिक विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. पक्षप्रमुखांच्या आवाहनाला शिरसावंद्य मानत २३ नोव्हेंबर रोजी अयोध्येसाठी रवाना होण्यावर शिवसैनिकांनी शिक्कामोर्तब केले. यावेळी सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी जिल्ह्याच्या कानाकोपºयातून शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शिवसैनिकांना प्रवासाकरिता रेल्वे, खासगी वाहन तसेच विमान प्रवासाबद्दल सविस्तर माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत २३ नोव्हेंबर रोजी अकोला येथून कूच करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीला निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकार, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, मुकेश मुरूमकार, दिलीप बोचे, शहर प्रमुख (पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, प्रदीप गुरुखुद्दे, संतोष अनासने, तरुण बगेरे, नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, तालुका प्रमुख विजय मोहोड, अप्पू तिडके, गजानन मानवतकर, संजय शेळके, रवी मूर्तडकर, विकास पागृत, योगेश गीते, योगेश अग्रवाल, नितीन ताथोड, संजय भांबेरे, एकनाथ दांदळे, रामचंद्र घावट, पप्पू चौधरी, गजानन मोरे, संतोष भगत, अजय ढोणे, मनीष मोहोड, आनंदा अढाऊ, गोपाळ म्हैसने, वहीद खान, अर्जुन गावंडे, दीपक इंगळे, गणेश कोरडे, प्रमोद पातोडे, महादेव भिसे जिल्हा महिला संघटक देवेश्री ठाकरे, रेखा राऊत, पं. स. सभापती गंगाताई अंभोरे, सरिता वाकोडे, राजेश्वरी शर्मा, नीलिमा तिजारे, वर्षा पिसोडे, रेखा तिवारी, हर्षा देवकर, संगीता मराठे, आशा गावंडे, सीमा मोकळकर, युवा सेनेचे कुणाल पिंजरकर, राहुल कराळे, योगेश बुंदेले, दीपक बोचरे, ऋषिकेश ताथोड, सचिन भाटे, राजेश पाटील, दिनेश ढगे, सौरभ नागोसे आदी उपस्थित होते.


पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा!
शिवसैनिकांना २३ नोव्हेंबर रोजी अयोध्येसाठी रवाना व्हावे लागणार आहे. अशावेळी प्रवास तसेच इतर विषयांवर सविस्तर माहिती हवी असल्यास शिवसैनिकांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाºयांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी यावेळी केले.

 

Web Title: Shivsena's voice for Ayodhya; Will be on 23rd November!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.