शिवस्मारक, दलित वस्तीतील कामांचे नियोजन करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:34+5:302021-03-17T04:18:34+5:30
अकोट : पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी नगर परिषदेला अकस्मात भेट देऊन आढावा घेतला. त्यांनी फरकाळेनगर, राहुलनगर, जेतवननगर आदी ...
अकोट : पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी नगर परिषदेला अकस्मात भेट देऊन आढावा घेतला. त्यांनी फरकाळेनगर, राहुलनगर, जेतवननगर आदी ठिकाणच्या दलित वस्तींना भेट देऊन रस्ते, समाजमंदिरे, नाले बांधणीचे निर्देश दिले.
जेतवननगर येथे रस्ताच नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. त्यांना नाल्यावर पूल बांधून अकोल्याकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले, तसेच खानापूर वेस येथे खुली व्यायामशाळा व वाचनालयाची सुविधा करण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी राहुलनगर येथे समाज भवन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असता पालकमंत्र्यांनी संमती दिली. याकरिता सुशील पुंडकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता. शिवाजी चौक येथील शिवाजी स्मारक येथे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी निधीची तरतूद केल्याचे सांगितले, तसेच घरकुलांसाठी येणाऱ्या अडचणी मार्गी लावल्या. यावेळी अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायाण माकोडे, सुशील पुंडकर, विवेक बोचे, दिलीप बोचे, निखिल गावंडे, कुलदीप वसू, तुषार पाचकोर, बल्ली राजा, समोर जमादार, बल्लूभाऊ, निखिल दोड, पवन बंकूवाले, चंदू दुबे, संदीप मर्दाने, आशिष गीते आदींची उपस्थिती होती.