परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरातून निघाली शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 02:39 PM2019-05-07T14:39:05+5:302019-05-07T14:39:14+5:30
शहरातील सकल बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने सोमवारी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा काढण्यात आली.
अकोला: ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव अक्षय तृतीयेला साजरा करण्यात येतो. यानिमित्त शहरातील सकल बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने सोमवारी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा काढण्यात आली.
आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते भगवान परशुराम यांचे पूजन करू न शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेच्या प्रारंभी अश्वावर स्वार असलेले छत्रपती शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेतील चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तर ढोलताशा पथकामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. भगवान परशुरामाची व भगवान महेशाची सुंदर मूर्ती शोभायात्रेचा आकर्षणाचा बिंदू होती. सैनिकांच्या वेशभूषेत असलेले चिमुकले शोभयात्रेचे आकर्षण ठरली.
शोभायात्रेत विजय तिवारी, उदय महा, विष्णुदत्त शुक्ला, सिद्धार्थ शर्मा, अॅड़ सौरभ शर्मा, अॅड़ गणेश परियाल, कालीशंकर अवस्थी, मोहन गद्रे, हितेश मेहता, राकेश त्रिवेदी, भरत मिश्रा, देवेंद्र तिवारी, हरिओम पांडे, आनंद चौबे, अमोल पाटील, चिंतामणी कुलकर्णी, गिरीश देशपांडे, राहुल जोशी, नितीन रेलकर, राकेश रावल, राकेश शर्मा, राजू शर्मा, विद्या शर्मा, लता शर्मा, कविता शर्मा, सारिका जोशी, सुनीता तिवारी, ममता तिवारी, पूजा इंडोरिया, शोभा जोशी, निर्मला तिवारी, शीतल तिवारी, प्रीती शर्मा, शीतल डोळ्या, एकता बगरेट, राजू जोशी, रवी मिश्रा, उमेश तिवारी, अरुण शर्मा, राजेश मिश्रा, गोविंद शर्मा, नितीन मिश्रा, शिव चौबे, तुषार शर्मा, आनंद शर्मा, नितीन जोशी, शंकर तिवारी, विष्णू तिवारी, राधेश्याम शर्मा, संजय शर्मा, अजय शर्मा, गोलू शर्मा, जगदीश जोशी, मनोज अवदानिया, भूषण इंदौरिया, कार्तिक शर्मा, अतुल शर्मा, शुभम तिवारी, संकेत शर्मा, शांतनू शिवाल, कपिल व्यास, विजय ओमानिया, दीपक शर्मा, भावेश शर्मा, आशुतोष शर्मा, प्रणव शिवाल, गजानन तिवारी, सूरज भिंडा, रजत तिवारी, जय तिवारी, बिट्टू बकरेट, कृष्णा शर्मा यांच्यासह शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गाने क्रमण करीत शोभायात्रा गांधी चौकात पोहचली.