धक्कादायक...राज्यातील १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:43 PM2019-01-29T13:43:31+5:302019-01-29T13:43:43+5:30
अकोला : शासकीय कार्यालयातील अडकलेले क ाम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात लाचेची रक्कम घेताना रंगेहात अटक केलेल्या राज्यातील तब्बल १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- सचिन राऊत
अकोला : शासकीय कार्यालयातील अडकलेले क ाम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात लाचेची रक्कम घेताना रंगेहात अटक केलेल्या राज्यातील तब्बल १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लाचखोरांना संबंधित विभागाने पाठीशी घालत त्यांच्या निलंबन कारवाईपासून त्यांना अभय दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली. त्याचेच फलित राज्यभर लाचखोरी करणाºया शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांवर ९३६ सापळे रचण्यात आले असून, लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्यानंतर लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयावर संबंधित विभागाकडून तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे सोडून त्यांना अभय दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यामध्ये २०१८ या एका वर्षातील १५५ लाचखोरांचे अद्यापही निलंबन झाले नसल्याचे वास्तव आहे. विभागीय चौकशी तसेच विविध कारणे समोर करून त्यांचे निलंबन थांबलेले आहे.
शिक्षण खाते भ्रष्टाचाराने बरबटले!
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गत एका वर्षामध्ये लाचखोरांवर केलेल्या कारवायांमध्ये शिक्षण विभागातील सर्वाधिक म्हणजेच ३६ अधिकारी व कर्मचाºयांचे निलंबन केले नाही. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या लाचखोरीत अडकलेल्या ३३ लाचखोरांचेही अद्याप निलंबन नाही, तर भूमी अभिलेख, महसूलच्या १५ अधिकारी व कर्मचाºयांचे निलंबन झाले नसून, सहकार व पणन खात्याचे १० तर गृह विभागातील आठ अधिकारी कर्मचाºयांचे निलंबन अद्याप झाले नसल्याचे वास्तव आहे.
लाचखोरीतून वाचविण्यासाठीही लाच
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून लाचखोर अधिकारी व कर्मचाºयावर कारवाई केल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी काही वरिष्ठांनीच पुन्हा लाचेचीच मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. निलंबन टाळण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सल्ल्यावर कामकाज होत असल्याने काही लाचखोरांची विभागीय चौकशी चालू आहे. काहींना ४८ तासांपेक्षा कमी काळ तुरुंगात घालावा लागल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई टाळण्यात आली आहे; मात्र ही कारवाई टाळण्यासाठीही सेटलमेंट झाल्याची चर्चा आहे.
निलंबित न केलेल्यांची विभागनिहाय आकडेवारी
मुंबई - १५
ठाणे - १३
पुणे - १७
नाशिक - ०७
नागपूर - ३१
अमरावती - १७
औरंगाबाद - २०
नांदेड - ३५