धक्कादायक : ‘कोरोना’बाधितांना मिळतेय दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 10:21 AM2020-05-07T10:21:48+5:302020-05-07T10:24:02+5:30

पिण्यासाठी दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण पुरविल्या जात असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत

Shocking: ‘Corona’ sufferers get contaminated water and inferior food! | धक्कादायक : ‘कोरोना’बाधितांना मिळतेय दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण!

धक्कादायक : ‘कोरोना’बाधितांना मिळतेय दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण!

Next
ठळक मुद्देदूषित पाणी प्यायला दिले जात असल्याची धक्कादायक माहिती काही रुग्णांनी सांगितली आहे.जेवणही निकृ ष्ट दर्जाचे दिले जात असल्याने बहुतांश रुग्ण बाहेरून जेवण मागवित असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता ही नेहमीचीच समस्या आहे; मात्र कोरोनासारख्या या महामारीमध्येही रुग्णालयातील अस्वच्छता कोरोनाबाधित रुग्णांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एवढेच नव्हे, तर या रुग्णांना पिण्यासाठी दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण पुरविल्या जात असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत; परंतु रुग्णालय प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही रुग्णांकडून केला जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. विशेषत: शहरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला मनुष्यबळाची कमी जाणवत आहे. त्यामुळे अस्वच्छतेची समस्या रुग्णांना सतावत आहे. दुसरीकडे रुग्णांना दूषित पाणी प्यायला दिले जात असल्याची धक्कादायक माहिती काही रुग्णांनी सांगितली आहे. जेवणही निकृ ष्ट दर्जाचे दिले जात असल्याने बहुतांश रुग्ण बाहेरून जेवण मागवित असल्याची माहिती आहे. याप्रकरणी कोरोनाबाधित रुग्णांनी डॉक्टर किंवा परिचारिकांकडे तक्रारीदेखील केल्या आहेत; पण रुग्णांच्या या तक्रारीकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रुग्णांकडून होत आहे. विशेष म्हणजे, काही रुग्णांनी थेट लोकप्रतिनिधींनाही याबाबत कल्पना दिली आहे. याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही.


वैद्यकीय तपासणीतही टाळाटाळ
कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीच्या बाबतीतही टाळाटाळ होत असल्याचा आरोप येथील रुग्णांनी केला आहे. मंगळवारी संध्याकाळी काही रुग्णांना त्यांची रक्त तपासणी आणि ‘ईसीजी’ सकाळी होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते; परंतु बुधवारची सायंकाळ झाली, तरी त्यांचे रक्त नमुने घेण्यात आले नसल्याचा आरोप रुग्णांकडून होत आहे.


रुग्ण बाहेरूनच मागवताहेत जेवण
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे दिले जाणारे जेवण निकृ ष्ट असल्याने आम्ही बाहेरूनच जेवण बोलावत असल्याचे कोरोना वॉर्डात दाखल रुग्णांचे म्हणणे आहे. शिवाय, काही रुग्ण हे त्यांच्या घरून जेवण मागवित असल्याचीही माहिती आहे.
रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीप्रकरणी तक्रारी आल्या असून, त्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करू . याप्रकरणी जीएमसी प्रशासनाला सूचना दिल्या जातील. रुग्णांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
- प्रा. संजय खडसे, उपजिल्हाधिकारी, अकोला.

 

Web Title: Shocking: ‘Corona’ sufferers get contaminated water and inferior food!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.