धक्कादायक : फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:21 AM2021-03-01T04:21:10+5:302021-03-01T04:21:10+5:30

१५ फेब्रुवारीनंतर घातला धुमाकूळ १ ते १५ फेब्रुवारी - १६ ते २८ फेब्रुवारी एकूण रुग्ण ...

Shocking: Corona's record-breaking positive patient in February! | धक्कादायक : फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण!

धक्कादायक : फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण!

Next

१५ फेब्रुवारीनंतर घातला धुमाकूळ

१ ते १५ फेब्रुवारी - १६ ते २८ फेब्रुवारी

एकूण रुग्ण - ८८१ - ३,५०५

मृत्यू - ८ - २३

बरे झालेले रुग्ण - ६२६ - ८७७

ॲक्टिव्ह - ९४७ - २८५८

केवळ ३४ टक्के रुग्णांनाच डिस्चार्ज

फेब्रुवारी महिन्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी असल्याचे दिसून आले. महिनाभरात केवळ १५०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजेच गत महिनाभरात पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ३४ टक्के आहे. सप्टेंबर २०२० मध्ये ही स्थिती चांगली होती. सप्टेंबरमध्ये एकूण रुग्णांच्या ७२ टक्के म्हणजेच २४६९ एवढे रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

मृत्युदरावर नियंत्रण

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात मृत्युदरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले. फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांत ३१ जणांचा बळी गेला. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा विचार केल्यास या महिन्यातील मृत्युदर केवळ ०.७० टक्के आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात ३६७ जणांचा बळी गेला असून, हा मृत्युदर २.२ टक्क्यांवर आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जवळपास एक टक्क्यांनी मृत्युदर घसरला आहे.

Web Title: Shocking: Corona's record-breaking positive patient in February!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.