धक्कादायक...शेतकरी दाम्पत्याने शेतात विष प्राशन करून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:59 PM2018-12-01T13:59:44+5:302018-12-01T14:39:08+5:30

अकोला : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना येथून जवळच असलेल्या गांधीग्राम येथे शुक्रवारी सकाळी घडली.

Shocking ... Farmer couple committed suicide by consuming poison in the field | धक्कादायक...शेतकरी दाम्पत्याने शेतात विष प्राशन करून केली आत्महत्या

धक्कादायक...शेतकरी दाम्पत्याने शेतात विष प्राशन करून केली आत्महत्या

Next

अकोला : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना येथून जवळच असलेल्या गांधीग्राम येथे शनिवार, १ डिसेंबर रोजी  सकाळी घडली. शेख उमर शेख मन्नान (४७) आणि नजरुन बी शेख उमर (४३) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

गांधीग्राम येथील शेख उमर याच्याकडे दोन ते अडीच एकर शेत असून, यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गत काही वर्षांपासून नापिकीचा सामना करावा लागत असलेल्या शेख उमर याच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५० ते ६० हजार रुपयांचे कर्ज आहे. चार मुलांच्या कुटुंबाचा गाडा ओढताना उमरची मोठी ओढतान होत होती. शुक्रवारी सकाळी शेख उमर व त्याची पत्नी नजरुन बी दोघेही शेतात कापूस वेचणीसाठी गेले. त्या ठिकाणी दोघांनीही किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची वार्ता पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. माहिती समजताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मनमिळाऊ स्वभावाचा शेख उमर आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.

 

Web Title: Shocking ... Farmer couple committed suicide by consuming poison in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.