धक्कादायक....मालमत्तेच्या वादातून विवाहित मुलीने केली वडिलांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:00 AM2019-10-11T11:00:26+5:302019-10-11T11:00:37+5:30
मालमत्तेवरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला आणि त्यावरून मुलीने संतप्त होऊन स्वत: च्या वडिलांची हत्या केली.
अकोला : मालमत्तेच्या वादातून सख्या मुलीने वडीलांची हत्या केल्याची घटना अकोला शहरातील खदान पोलिस ठाण्याअंतर्गत गुरवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीस अटक केली आहे.
खदान पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एसटीच्या प्रादेशिक कार्यशाळेमागे असलेल्या बाबुराव कंकाळ यांच्यावर त्यांची विवाहित मुलगी रेश्मा बाविस्कर हिने गुरुवारी रात्री चाकूने हल्ला केला. या घटनेत बाबूराव गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्याना सवोर्चार रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी तपासणीनंतर बाबुराव यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तेथे पोलिसांनी घटनेतील आरोपी रेश्मा बाविस्करला मुलगी अटक केली आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्तेवरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला आणि त्यावरून मुलीने संतप्त होऊन तिच्या स्वत: च्या वडिलांची हत्या केली.