अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे शोले स्टाइल आंदोलन, मदतीच्या मागणीसाठी चढले आकाशवानी टॉवरवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 12:59 PM2020-11-02T12:59:25+5:302020-11-02T13:02:08+5:30

टाकळी निमकर्दा येथील अक्षय साबळे आणि गोपाल पोहरे हे सोमवारी सकाळच्या सुमारास अकोला शहरातील आकाशवानीच्या टॉवरवर चढले.

Sholay style agitation of rain-stricken farmers, climbed the All India Radio tower to demand help | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे शोले स्टाइल आंदोलन, मदतीच्या मागणीसाठी चढले आकाशवानी टॉवरवर 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे शोले स्टाइल आंदोलन, मदतीच्या मागणीसाठी चढले आकाशवानी टॉवरवर 

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीग्रस्तांना सरसकट २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी टाकळी निमकर्दा येथील अक्षय साबळे आणि गोपाल पोहरे हे सोमवारी सकाळच्या सुमारास अकोला शहरातील आकाशवानीच्या टॉवरवर चढले.माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या दोन्ही शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही सुरू केला होता.

अकोला : अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट २५ हजार रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी बाळापूर तालुक्यातील टाकळी निमकर्दा येथील दोन शेतकरी अकोला शहरातील आकाशवानी टॉवरवर चढले. सोयाबीनला भाव मिळत नाही, तोवर उतरणार नसल्याचे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

टाकळी निमकर्दा येथील अक्षय साबळे आणि गोपाल पोहरे हे सोमवारी सकाळच्या सुमारास अकोला शहरातील आकाशवानीच्या टॉवरवर चढले. या शेतकऱ्यांनी, अतिवृष्टीग्रस्ताना सरकसट २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी, तसेच सोयाबीनला योग्य भाव देण्याची मागणी केली आहे. याशिवाय कर्ज माफीचा लाभ न देणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवरही कारवाइ करण्यात यावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या दोन्ही शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही सुरू केला होता.



 

Web Title: Sholay style agitation of rain-stricken farmers, climbed the All India Radio tower to demand help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.