कापूस खरेदीच्या वादातून बार्शिटाकळीत गोळीबार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:43+5:302021-05-25T04:21:43+5:30
आरोपींमध्ये अमरावती जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश सूत्रांच्या माहितीनुसार, हाणामारी प्रकरणातील काही आरोपी हे अमरावती जिल्ह्यातील असून, यापूर्वी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे ...
आरोपींमध्ये अमरावती जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश
सूत्रांच्या माहितीनुसार, हाणामारी प्रकरणातील काही आरोपी हे अमरावती जिल्ह्यातील असून, यापूर्वी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माेनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस, पिंजर ठाणेदार पडघन, विजय पाटील, पिंजरकर, दिनेश अघडते यांची उपस्थिती होती.
कडक पोलीस बंदोबस्त
घटनेनंतर हालुपुरा परिसरात आरसीपी प्लाटूनच्या तुकडीस पाचारण करण्यात आले. या प्रसंगी परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून, कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.