निर्बंधांच्या गाेंधळात दूकाने केली बंद; रस्त्यावरची गर्दी कायमच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:01+5:302021-04-07T04:19:01+5:30
ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश काढून कडक निर्बंध लादले. मंगळवारी सकाळी ...
ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश काढून कडक निर्बंध लादले. मंगळवारी सकाळी या निर्बंधांना समजून घेण्याचा गाेंधळ उडाल्याचे चित्र हाेते. मिनी लाॅकडाऊन असा उल्लेख केला असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे प्रत्यक्षात जिल्हाभरात रस्त्यांवर लोकांची मोठी गर्दी दिसून आली. कुठेही जमावबंदी कायद्याच्या उल्लंघनाची कारवाई झाली नाही. केवळ जीवनावश्यक वस्तुची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही मंगळवारी सकाळी नवीन कापड बाजार व सिव्हील लाईन रोडवरील काही दुकाने उघडली होती. पोलिस व मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नंतर ही दुकाने बंद केली. रस्त्यांवर व जीवनावश्यक दुकानांसमोर नागरिकांची गर्दी मात्र कायम आहे. पेट्रोलपंप, गॅस वितरण, भाजीपाला व फळांची दुकाने उघडी आहेत. हाॅटेलमधून पूर्वी प्रमाणचे पार्सल सुविधा सुरू हाेती.