जिवापेक्षा खरेदी महत्त्वाची; शंभर रुपयांच्या भाजीपाल्यासाठी दररोज चकरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 11:02 AM2021-05-05T11:02:03+5:302021-05-05T11:02:09+5:30

Akola News : शहरातील भाटे क्लब ग्राऊंड, डाबकी रोडवरील बाजार, ताजना पेठजवळील बाजारात वर्दळ वाढली आहे.

Shopping is more important than life for Akola citizen | जिवापेक्षा खरेदी महत्त्वाची; शंभर रुपयांच्या भाजीपाल्यासाठी दररोज चकरा!

जिवापेक्षा खरेदी महत्त्वाची; शंभर रुपयांच्या भाजीपाल्यासाठी दररोज चकरा!

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात संचारबंदी असल्याने आठवडी बाजार बंद असले तरी शहरातील भाजी बाजार सुरू आहे; मात्र अनेकांना जिवापेक्षा भाजीपाला खरेदी महत्त्वाची असल्याचे दिसून येत आहे. केवळ शंभर रुपयांच्या भाजीपाल्यासाठी नागरिक दररोज बाजारात चकरा मारत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी ११ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. या वेळेत भाजीपाला, फळविक्री करता येत आहे; परंतु या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण रिकामे फिरत आहेत. एकीकडे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे आवश्यक नसलेल्या कामासाठी नागरिक रस्त्यांवर गर्दी करीत आहेत. शहरातील भाटे क्लब ग्राऊंड, डाबकी रोडवरील बाजार, ताजना पेठजवळील बाजारात वर्दळ वाढली आहे.

  

या मार्गावर हजारोंची वर्दळ

शहरातील टिळक रोड, गांधी चौक ते ताजनापेठ मार्गावर अत्यावश्यक सेवेच्या वेळेत मोठी वर्दळ होत आहे. हजारो अकोलेकर किरकोळ खरेदीच्या नावाखाली गर्दी करीत आहे. गांधी चौक ते ताजनापेठ मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक खोळंबली होती.

 

घराजवळ पाहिजे तो भाजीपाला मिळत नाही!

काही महाभाग घराजवळ पाहिजे तो भाजीपाला मिळत नसल्याने ये-जा करीत आहे. असे शहरातील भाटे क्लब ग्राऊंडवरील बाजारात व ताजनापेठ परिसरातील बाजारात खरेदीसाठी आलेल्या काही ग्राहकांनी सांगितले.

 

भाजीपाला नव्हे तर जीव झाला स्वस्त!

बाजारात भाजीपाला व फळ स्वस्त मिळतात, त्यामुळे अनेक नागरिक दोन-तीन किमीचा प्रवास करीत बाजारात खरेदीसाठी गर्दी करीत आहे. पावकिलो भाजीपाल्यासाठी बिनधास्तपणे नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे.

 

 

दुकाने बंद; तरी ‘त्या’ साहित्यासाठी चकरा

संचारबंदीमुळे घरी बसावे लागत असल्याने काही नागरिक घराची रंगरंगोटी, बांधकामसह इत्यादी कामे आटोपण्याच्या तयारीत आहे; परंतु अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर या कामाचे साहित्य मिळेल असे दुकान उघडे मिळते का? यासाठी अनेकांच्या चकरा सुरू आहे.

 

निंबू, फळांसाठी बाजारात

शहरात फिरून फळ व भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तरी बहुतांश नागरिक घराजवळ खरेदी करणे टाळत आहे. बाजारात पाहणी केली असता काही जण केवळ दर्जेदार निंबू व फळ हवे असल्यामुळे बाजारात आले होते.

Web Title: Shopping is more important than life for Akola citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.