दुकाने बंद; रस्त्यांवर शुकशुकाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:19 AM2021-05-11T04:19:11+5:302021-05-11T04:19:11+5:30
‘आरडीसीं’ना अडविले पोलिसांनी! निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांनी सोमवारी अकोला शहरातील विविध भागांत कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी केली. ...
‘आरडीसीं’ना अडविले पोलिसांनी!
निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांनी सोमवारी अकोला शहरातील विविध भागांत कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी केली. दुचाकीने जुने शहर भागात जात असताना, लोखंडी पुलावर पोलिसांनी ‘आरडीसी’ संजय खडसे यांनाही अडविले. ओळख पटल्यानंतर त्यांना पुढील ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेत सामसूम !
कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीत अत्यावश्यक सेवा वगळता विविध शासकीय कार्यालयांचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. त्यानुषंगाने अत्यावश्यक सेवा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज सुरू होते. दुय्यम निबंधक कार्यालयातील मालमत्ता खरेदी- विक्रीचे व्यवहार व इतर कामकाज बंद होते, तसेच जिल्हा परिषदेत आरोग्य व पाणीपुरवठा विभाग वगळता इतर विविध विभागांचे कामकाज बंद होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद परिसरात सोमवारी सामसूम वातावरण दिसत होते.