निर्बंधांच्या गाेंधळात दुकाने बंद; अकोटात व्यापाऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:32+5:302021-04-07T04:19:32+5:30
चार वाजेपर्यंत दुकानांना परवानगी द्या अकोट तालुक्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. शासनाचे आदेशानुसार कोरोना चाचणी दुकानदाराने केली आहे. शहरातील ...
चार वाजेपर्यंत दुकानांना परवानगी द्या
अकोट तालुक्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. शासनाचे आदेशानुसार कोरोना चाचणी दुकानदाराने केली आहे. शहरातील ७० टक्के दुकाने सुरू आहेत. रेडिमेड, कापड, मोबाइल व कटलरीची दुकाने बंद आहेत. या दुकानात अंदाजे पाच हजार कामगार काम करतात. या लाॅकडाऊनमुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन काळात आठवड्यात पाच दिवस सकाळी ८-४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली. व्यापाऱ्यांनी काही दुकाने सुरू ठेवली तर काहींनी बंद ठेवली. दरम्यान उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी तात्काळ आदेश काढून काही मुद्द्यांवर बाजारपेठ बंद- सुरू बाबत सूचना जारी केली. अकोट नगर परिषद यांनी व्यापाऱ्यांना बाजारपेठ संदर्भात लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करणे आवश्यक झाले आहे.