थार येथे शॉर्ट सर्किटने आग

By admin | Published: April 24, 2017 01:53 AM2017-04-24T01:53:56+5:302017-04-24T01:53:56+5:30

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील थारनजीक असलेल्या एमआयडीसीजवळ रस्त्याच्या कडेला शेतामध्ये दुपारी ४ वाजताच्या दरम्यान आग लागली. परिसरातील गव्हाचे पीक बचावले.

Short circuit fire at Thar | थार येथे शॉर्ट सर्किटने आग

थार येथे शॉर्ट सर्किटने आग

Next

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील थारनजीक असलेल्या एमआयडीसीजवळ रस्त्याच्या कडेला शेतामध्ये दुपारी ४ वाजताच्या दरम्यान आग लागली. परिसरातील गव्हाचे पीक बचावले.
तेल्हारा-आडसूळ मार्गावर एमआयडीसीनजीक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्याच्या पऱ्हाट्यांच्या गंजीने पेट घेतला. हवेमुळे आगीचे लोट तेल्हारा-आडसूळ मुख्य रस्त्यावर आले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक वळविण्यात आली होती. गावातील नागरिकांनी तेल्हारा न. प.च्या नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली असता, त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पाठविली व आग आटोक्यात आली, त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांच्या गव्हाचे पीक बचावले. या ठिकाणी अनेक वेळा शॉर्ट सर्किटमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. महावितरणने येथील कामाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गांडूळ प्रकल्प शेडला आग
अकोट तालुक्यातील वणी वारुळा येथे गावालगत असलेल्या मळ्यातील गांडूळ प्रकल्पाच्या शेडला २३ एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठी हानी टळली. वणी वारुळा गावालगत भागीरथ पोटे यांच्या मळ्यातील गांडूळ प्रकल्पाचे शेड व आजूबाजूला ठेवलेल्या इंधनाला अचानक आग लागली. विद्युत पुरवठा बंद असल्याने आग विझविण्यास अडचणी निर्माण झाल्या. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर आग विझविण्यात आली. त्यामुळे मळ्यातील सहा एकरांतील लिंबूची झाडे व गावालगतची घरे आगीपासून वाचली. घटनास्थळावर तलाठी नरेश रतन यांनी पंचनामा केला. घटनेची माहिती तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आली.

Web Title: Short circuit fire at Thar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.