प्राथमिक आरोग्य केंद्रात लसींचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:35+5:302021-05-14T04:18:35+5:30
वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार (दि.११ मे)पर्यंत कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागले. ...
वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार (दि.११ मे)पर्यंत कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागले. कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ११ मे रोजी बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात अठरा वर्षीय वयोगटातील, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना कोविड लसीकरण मोहीम सुरू होती. परंतु, कोविड प्रतिबंधक लस राखीव ठेवण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाळापूर येथील शिवसैनिकांसह नागरिकांनी निवेदन दिले. परंतु, वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारपासून लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोमवारी केवळ १५० जणांचे लसीकरण करण्यात आले.
फोटो :
लस उपलब्ध करण्याबाबत चर्चा
ग्रामपंचायत सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ, सदस्य सचिन धनोकार, मुजाहिद दस्तगीर, सुनील मानकर, राजकुमार अवचार, ॲड. सुबोध डोंगरे, मोहम्मद असलम, अजय इंगळे, राजकुमार चिंचोळकर, आदींनी लस उपलब्ध करण्याबाबत आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच चर्चा केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भावना हाडोळे यांनी लस तातडीने उपलब्ध करण्यात येतील, असे सांगितले.