वाडेगाव येथील लसीकरण केंद्रात लसींचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:19 AM2021-05-08T04:19:22+5:302021-05-08T04:19:22+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, दि. २६ ...
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, दि. २६ एप्रिल रोजी कोविड १९ लसीकरण सुरू झाले होते. येथील लोकसंख्या पाहता, मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले असून, गुरुवार रोजी १३० ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. शुक्रवारपासून लसीकरण केंद्रात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने, ग्रामस्थांना खाली हात परतावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने ४५ वर्षी वयोगटांतील ग्रामस्थांकरिता लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
-----------------
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने, ग्रामस्थांना लस वेळेवर मिळत नसल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन लस उपलब्ध करून द्यावी.
- बंडू गोस्वामी, ग्रामस्थ, वाडेगाव