आरोग्य विभागातील तीन अधिकार्यांना कारणे दाखवा
By admin | Published: September 14, 2014 01:44 AM2014-09-14T01:44:01+5:302014-09-14T01:44:01+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशनचा दणका; अकोला जिल्हा परिषद ‘डीसीईओं’चा आदेश.
अकोला : शासकीय कार्यालयांमधील अधिकार्यांच्या दालनात महत्त्वपूर्ण दस्तऐवज असुरक्षित असल्याचे ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण शुक्रवारी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी (डीसीईओ) जिल्हा परिषद आरोग्य विभागातील तीन अधिकार्यांना शुक्रवारी सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावून तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.
जिल्ह्यातील विविध सरकारी-निमसरकारी कार्यालयांमध्ये अधिकार्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या टेबलवर असलेल्या महत्त्वपूर्ण फाईल्स व दस्तऐवजाची सुरक्षा करणारे कोणीही नसते. तसेच अधिकार्यांच्या कक्षाच्या प्रवेशद्वारावर येणार्या-जाणार्यांना विचारपूस करण्यासाठी व हटकण्यासाठी कोणीही नसते. त्यामुळे अधिकार्यांच्या दालनातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज असुरक्षित असल्याची बाब गुरुवारी लोकमत चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आली होती. ह्यअधिकार्यांच्या दालनातील दस्तऐवज असुरक्षितह्ण या शीर्षकाखाली ह्यस्टिंग ऑपरेशनह्णचे वृत्त शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे.