विहीर घोटाळ्याच्या माहितीसाठी पुन्हा कारणे दाखवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:11 AM2018-03-14T02:11:30+5:302018-03-14T02:11:30+5:30

अकोला :  गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देण्यात आली, त्याचवेळी अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे शेकडो शेतकºयांना सिंचन विहीर योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. पातूर, बाळापूर तालुक्यातील सिंचन विहिरीतील घोळ निश्चित करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्येच मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नोटीस बजावली. अद्यापही माहिती न आल्याने संबंधित गटविकास अधिकाºयांना सोमवारी पुन्हा नोटीस देत तातडीने माहिती सादर करण्याचे बजावण्यात आले. विशेष म्हणजे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनानंतर उद्या, १४ मार्च रोजी त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होत आहे. 

Show reasons for the well-being scam! | विहीर घोटाळ्याच्या माहितीसाठी पुन्हा कारणे दाखवा!

विहीर घोटाळ्याच्या माहितीसाठी पुन्हा कारणे दाखवा!

Next
ठळक मुद्देसेना जिल्हा प्रमुख देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनानंतर आज बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देण्यात आली, त्याचवेळी अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे शेकडो शेतकºयांना सिंचन विहीर योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. पातूर, बाळापूर तालुक्यातील सिंचन विहिरीतील घोळ निश्चित करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्येच मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नोटीस बजावली. अद्यापही माहिती न आल्याने संबंधित गटविकास अधिकाºयांना सोमवारी पुन्हा नोटीस देत तातडीने माहिती सादर करण्याचे बजावण्यात आले. विशेष म्हणजे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनानंतर उद्या, १४ मार्च रोजी त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होत आहे. 
बाळापूर तालुक्यात सिंचन विहिरींसाठी ६४५ लक्ष्यांक असताना ९२४ लाभार्थींना मंजुरी आदेश देण्यात आले. त्यापैकी २७९ आदेशांची पंचायत समिती कार्यालयात कुठेच नोंद नाही. लाभार्थींना मिळालेल्या पत्रानुसार विहिरींचे काम सुरू केले. त्या लाभार्थींना आता देयक न देता अडवण्यात येत आहे. कार्यालयाबाहेर तयार केलेले आदेश देत त्यापोटी लाभार्थींकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार अधिकारी-दलालांनी केल्याचे उघड झाले. त्याचवेळी आदेश कार्यालयाबाहेर असताना त्या लाभार्थींना पहिला, दुसºया हप्त्याची रक्कम पंचायत समितीकडून देण्यात आली. पातूर, बाळापूर तालुक्यातील शेतकºयांची ही समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ७ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी सिंचन विहिरी मंजुरीत झालेल्या घोळाची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. त्यावर सिंचन विहिरी लाभार्थींची समस्या सोडवण्यासाठी १४ मार्च रोजी सर्वच गटविकास अधिकाºयांची बैठक बोलावण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

सिंचन विहिरींचा घोटाळा बाहेर येणार!
पातूर, बाळापूर तालुक्यातील विहिरींना मंजुरी, निधी वाटप, गावांतील लक्ष्यांक, त्यानुसार दिलेली मंजुरी, या सर्व बाबींची माहिती आधीही मागवण्यात आली. त्यावेळी संबंधित गटविकास अधिकाºयांनी रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाºयांचा संप असल्याने माहिती देता आली नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर तीन महिने उलटले तरीही माहिती सादर केली नाही. त्यावर उद्या, १४ मार्च रोजीच्या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा नोटीस बजावत तातडीने माहिती सादर करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी बजावले. उद्याच्या बैठकीत संपूर्ण घोळ बाहेर येण्याची शक्यता आहे. 
 
Web Title: Show reasons for the well-being scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला