श्री रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे वंचित, पीडित महिलांना शिलाई मशीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 02:01 PM2019-09-07T14:01:34+5:302019-09-07T14:01:56+5:30
राणी पनपालिया, सुनीता चौरे, सुनीता जामोदकर व फागुनी तळोकार यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले.
अकोला: श्री रामनवमी शोभायात्रा समिती पीडित वंचित व सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम सर्वांना सोबत घेऊन अकोला पंचक्रोशीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केल्याचे प्रतिपादन माहेश्वरी समाज पक्षाचे अध्यक्ष रमेश चांडक यांनी केले. मोठ्या राम मंदिरात श्री रामनवमी शोभायात्रा समिती व आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने १५ महिलांना मातृशक्ती सबलीकरण कार्यक्रमांतर्गत शिलाई मशीन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक ब्रिजमोहन चितलांगे, समितीचे अध्यक्ष विलास अनासाने, वसंत बाछुका, उपमहापौर वैशाली शेळके मंचावर विराजमान होत्या.
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने शहरातील विविध स्तरातील महिलांच्या परिस्थितीची पाहणी करून १५ जणांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. त्यामध्ये जयश्री कोलटकर, भारती डोंगरे, दीप्ती वाघमारे, दीपाली भागवत, वर्षा गायगोले, लक्ष्मी तिवारी, नंदिनी मोरे, ममता शाहू, राणी पनपालिया, सुनीता चौरे, सुनीता जामोदकर व फागुनी तळोकार यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. आमदार शर्मा यांच्यावतीने श्री रामनवमी शोभायात्रा समिती संकटसमयी प्रत्येकाला आधार देण्याचे काम जन्मोत्सवासोबत प्रत्येकाच्या घरात आनंद व्हावा, यासाठी कार्यरत राहणार आहे, असे सांगून रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने अजून २१ जणांना मदत देण्यात येण्याची घोषणा केली. यावेळी ब्रिजमोहन चितलांगे, वसंत बाछुका यांनी आपले विचार व्यक्त केले. महिलांच्यावतीने दीप्ती वाघमारे व जयश्री कोल्हटकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी आमदार शर्मा यांच्या हस्ते ब्रिजमोहन चितलांगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अनिल मानधने यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले. आभार गिरिराज तिवारी यांनी मानले.