‘शाळेबाहेरची शाळा’ कार्यक्रमांतर्गत श्रीहरी आज नागपूर आकाशवाणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:17 AM2021-03-20T04:17:40+5:302021-03-20T04:17:40+5:30

शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमाच्या ११९ व्या भागामध्ये शनिवार २० मार्च रोजी सकाळी १०:३५ वाजता प्रसारण होणार ...

Shrihari on Nagpur All India Radio today under 'Out of School' program! | ‘शाळेबाहेरची शाळा’ कार्यक्रमांतर्गत श्रीहरी आज नागपूर आकाशवाणीवर!

‘शाळेबाहेरची शाळा’ कार्यक्रमांतर्गत श्रीहरी आज नागपूर आकाशवाणीवर!

Next

शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमाच्या ११९ व्या भागामध्ये शनिवार २० मार्च रोजी सकाळी १०:३५ वाजता प्रसारण होणार आहे. हा अभिनव उपक्रम जून महिन्यापासून जिल्हा परिषद अकोला (प्राथमिक) आणि प्रथम फाऊंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून नागपूर आकाशवाणी केंद्रावरून मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. यामध्ये अंगणवाडी ते ८ वीपर्यंत अभ्यास घेतला जातो. मुले माता-पालक यांच्या मदतीने अभ्यास पूर्ण करतात. या ११९ व्या भागात श्रीहरी व त्याची आई दैनंदिन जीवनातील, श्रीहरीबद्दल, अभ्यासाबद्दल लॉकडाऊनबद्दल, अभ्यासाचे अनुभव सांगणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरिता जिल्हा परिषद अकोला व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन कार्य करत आहे. प्रथम संस्था तालुक्यातील ३० गावात काम करत असून, यासाठी प्रथमचे सुनील इंगळे, अमोल नाईक, वैभव बाजड, भावेश हिरूळकर, मनीष ठाकरे, जयश्री पवार, स्वाती गावंडे परिश्रम घेत आहेत. तसेच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा विराहितचे मुख्याध्यापक भगत, शिक्षक वृंद, गावंडे, रडके, तायडे, शाळा समिती अध्यक्ष गजानन राऊत यांचेसुद्धा मोलाचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे.

Web Title: Shrihari on Nagpur All India Radio today under 'Out of School' program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.