श्रीराम नवमी उत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:17 AM2021-04-13T04:17:52+5:302021-04-13T04:17:52+5:30
मराठी नववर्षाचे रक्तदानाने स्वागत करा अकोला : सध्या कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात रक्तदानाने ...
मराठी नववर्षाचे रक्तदानाने स्वागत करा
अकोला : सध्या कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात रक्तदानाने करावी. नागरिकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जठारपेठेतील डाॅ. हेडगेवार रक्तपेढी येथे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करावे, असे आयोजकांनी केले आहे.
जिल्ह्यात २०३ बेवारस वाहने
अकोला : जिल्ह्यातील विविध पाेलीस स्टेशनला २०३ बेवारस वाहने धूळ खात पडून आहेत. या बेवारस वाहनांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. जिल्ह्यातील बेवारस वाहन मालकांचा शोध घेऊन वाहनाची ओळख पटवून वाहने परत देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. वाहन मालकांनी वाहनांची कंपनी, पासिंग नंबर, इंजिन नंबर, चेचिस नंबर याबाबतची पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आरटीई प्रवेश : पालकांना एसएमएस
अकोला : आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशासाठी पहिली सोडत ७ एप्रिलला ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मोबाइल फोनवर एसएमएस येणार आहेत. परंतु त्यानंतर पालकांनीही संकेतस्थळाला भेट देऊन खातरजमा करावी लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ७२६ पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. आरटीई नोंदणीकृत शाळांची संख्या १ हजार ९६० आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचणीही ग्राह्य
अकोला: राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता त्याबरोबर १० एप्रिलपासून ॲन्टीजेन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल. याबाबत राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी आदेश दिले आहेत. आरटीपीसीआर चाचणीला पर्याय म्हणून रॅपिड टेस्ट चाचणी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने, नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतानाही नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानंतरही नागरिक रस्त्यांवर गर्दी करत आहेत. विना मास्क फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका प्रशासनाने, पोलिसांनी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाईची धडका सुरू केला आहे. सोमवारी मनपाने २४ जणांविरुद्ध कारवाई करून दंड वसूल केला.