सांगळूद-घुसर मार्गावर वाढली झुडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:17 AM2021-04-05T04:17:16+5:302021-04-05T04:17:16+5:30

------------------------------ शेतीकामासाठी मजुरांची वानवा पातूर : रब्बी हंगामातील विविध पिकांची कापणी सुरु असल्याने ग्रामीण भागात मजुरांची टंचाई भासत आहे. ...

Shrubs grew on the Sanglud-Ghusar road | सांगळूद-घुसर मार्गावर वाढली झुडपे

सांगळूद-घुसर मार्गावर वाढली झुडपे

Next

------------------------------

शेतीकामासाठी मजुरांची वानवा

पातूर : रब्बी हंगामातील विविध पिकांची कापणी सुरु असल्याने ग्रामीण भागात मजुरांची टंचाई भासत आहे. त्यातच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या भीतीनेही अनेक जण कामासाठी टाळाटाळ करत आहेत. तसेच मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

-----------------------------------------

आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळेना

अकोट : शासनाने आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत; मात्र प्रत्यक्ष आदिवासी प्रकल्प कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे योजनांचा लाभ मिळत नाही.

-----------------------------------------

ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था

बाळापूर : तालुक्यातील अनेक गावांतील स्मशानभूमीला रस्त्यांची समस्या आहे. येथील समस्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दुरवस्थेतील स्मशानभूमी जिल्हा प्रशासनाने दुरुस्त कराव्या, अशी मागणी होत आहे.

----------------------------------------

नवथळ येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

आगर : येथून जवळच असलेल्या नवथळ येथील प्रवासी निवारा सध्या शोभेची वास्तू बनलेला आहे. प्रवाशांना प्रवासी निवाऱ्याबाहेर उभे राहून गैरसोयीचा सामना करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------------------------

कार्यालयांमध्ये तक्रार पेट्यांची मागणी

बाळापूर: शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी वरिष्ठांकडे जाणार या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.

--------------------------------------------------------

वाडेगाव-माझोड रस्त्याची दुरवस्था

माझोड : वाडेगाव-माझोड रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर दररोज अपघात घडतात. सर्वसामान्यांना सदर रस्ता धोकादायक ठरत असताना बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------------------------

ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात

बार्शीटाकळी: तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे फोफावले आहेत. काही महिन्यांपासून या परिसरात रेती वाहतूक, जनावरांची अवैध वाहतूक, दारू, जुगार व गुटखा विक्री अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

------------------------------------------------- -

व्याळा-टाकळी खुरेशी रस्त्याचे काम धिम्यागतीने

बाळापूर : तालुक्यातील व्याळा-टाकळी खुरेशी रस्त्याचे काम धीम्यागतीने सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

-------------------------------

रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी

तेल्हारा : तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहेे.

-------------------------------------------------

रोजगार सेवकांना अत्यल्प मानधन

चिखलगाव : लोकांच्या हाताला काम द्यावे, म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात रोजगार सेवकांची जबाबदारी आहे. पण त्यांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे. त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, अशी मागणी आहे.

-----------------------------------------------------

नेटवर्कअभावी मोबाईल ग्राहक त्रस्त

पिंजर : परिसरात विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.

----------------------------------------------------------------------

क्रीडासंकुलाची दयनीय अवस्था

पातूर : येथील क्रीडासंकुलाची दुरुवस्था झाली आहे. क्रीडासंकुलामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रीडासंकुलाचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

-------------------------------------------

Web Title: Shrubs grew on the Sanglud-Ghusar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.