शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून १०८ जोडपी झाली विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:50 PM2017-11-01T13:50:33+5:302017-11-01T13:51:32+5:30
अकोला: शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून अकोला जिल्ह्यातील १०८ जोडपी विवाहबद्ध झाली असून, या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये १० लाख ८०हजार रुपयाचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.
अकोला: शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून अकोला जिल्ह्यातील १०८ जोडपी विवाहबद्ध झाली असून, या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये १० लाख ८०हजार रुपयाचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.
मुलींच्या किंवा मुलांच्या विवाहावर फार मोठा खर्च होतो. सामान्य शेतकरी किंवा गरीब कुटुंबांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. विवाहावरचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी वर्ग सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होतो. शेतकरी आत्महत्या करण्यामागे हे सुध्दा प्रमुख कारण आढळून आले आहे. या प्रश्नावर मात
करण्यासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर यांचा विवाहवरचा खर्च वाचविण्यासाठी महिला व बालविकास विभागाद्वारे शुभमंगल सामुहिक विवाह योजना/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच कर्जबाजारीपणा वाढू नये म्हणून ही योजना सन २००८ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेची
व्याप्ती शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आहे.
या योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये अमरावती विभागातील १५८३ लाभार्थ्यांना सामुहिक विवाह योजनेतून १ कोटी ७६ लाख ९६ हजार रुपये अनुदान महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील २४१ लाभार्थ्यांना २८ लक्ष ९२ हजार रुपये विवाह खर्च देण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील १६७ लाभार्थ्यांना २० लक्ष ४ हजार रुपये, बुलडाणा जिल्ह्यातील ९२५ लाभार्थ्यांना १ कोटी ११ लक्ष रुपये तर वाशिम जिल्ह्यातील १४२लाभार्थ्यांना १ लक्ष २० हजार रुपये विवाह खर्च अनुदान स्वरुपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
अशी आहे योजना
या योजने अंतर्गत सामुहिक विवाहात सहभागी होणाºया शेतकरी/शेतमजूर यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे १० हजार रुपये एवढे अनुदान वधुच्या वडिलांच्या नावाने, वडिल हयात नसल्यास वधुच्या आईच्या नावाने व आई-वडिल दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावाने धनादेश देण्यात येते. याशिवाय या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतात, त्यांनाही १० हजार रुपये अनुदान देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता संबंधित संस्थेस प्रति जोडपे दोन हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान (विवाह नोदंणी शुल्कासह) विवाह योजनेसाठी देण्यात येते.