अकोला जिल्ह्यातील सेतू केंद्र बंद; कामकाज प्रभावित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:06 PM2017-11-24T23:06:22+5:302017-11-24T23:08:58+5:30

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र (सेतू केंद्र) शुक्रवारी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेतू केंद्रांमार्फत होणारे कामकाज प्रभावित झाल्याने, विविध कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले.

Shuttle center closes in Akola district; Work effected! | अकोला जिल्ह्यातील सेतू केंद्र बंद; कामकाज प्रभावित!

अकोला जिल्ह्यातील सेतू केंद्र बंद; कामकाज प्रभावित!

Next
ठळक मुद्देनागरिकांना सहन करावे लागले हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र (सेतू केंद्र) शुक्रवारी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेतू केंद्रांमार्फत होणारे कामकाज प्रभावित झाल्याने, विविध कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले.

ज्या गावांमध्ये महा ई-सेवा केंद्र सक्षमरीत्या नागरिकांना सेवा देऊन उदरनिर्वाह करीत आहेत, अशा गावांमध्ये अतिरिक्त सीएससी केंद्र देण्यात येऊ नये, शहरी भागात सीएससी केंद्र मंजूर करताना एक किलोमीटर अंतराची र्मयादा ठेवण्यात यावी, महा ई-सेवा केंद्रांमार्फत दिल्या जाणार्‍या विविध शासकीय व निमशासकीय सेवांसाठी देण्यात येणार्‍या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, संग्राम केंद्राच्या धर्तीवर मानधन, संगणक, प्रिंटर, वीज, स्टेशनरी व सरकारी गाळे, असा लाभ देण्यात यावा, महा ई-सेवा केंद्र चालकांना कमी व्याज दरावर कर्ज देण्यात यावे, डिजिटल ७/१२ व ८-अ चा अद्ययावत डेटा महा ई-सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे  इत्यादी मागण्यांसाठी राज्यातील महा ई-सेवा केंद्र चालकांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंदला पाठिंबा म्हणून अकोला जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र चालकांनी २४ नोव्हेंबर रोजी महा ई-सेवा केंद्र बंद ठेवले. दिवसभर सेतू केंद्र बंद राहिल्याने सेतू केंद्रामार्फत होणारे कामकाज प्रभावित झाले. त्यामुळे सेतू केंद्रांमार्फत होणार्‍या कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले.

Web Title: Shuttle center closes in Akola district; Work effected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.