धार्मिक स्थळांसाठी स्वाक्षरी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:50+5:302021-08-21T04:23:50+5:30
मनपाकडून बेवारस वाहन जप्त अकाेला : शहरातील मुख्य रस्ते तसेच वाहन दुरुस्तीच्या दुकानासमाेर भंगार व बेवारस स्थितीत पडून असलेल्या ...
मनपाकडून बेवारस वाहन जप्त
अकाेला : शहरातील मुख्य रस्ते तसेच वाहन दुरुस्तीच्या दुकानासमाेर भंगार व बेवारस स्थितीत पडून असलेल्या वाहनांना जप्त करण्याची कारवाई मनपा प्रशासनाने सुरु केली आहे. शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने सर्वाेपचार रुग्णालय समाेरील मुख्य रस्त्यालगत भंगार अवस्थेतील एक वाहन जप्त केले. सदर वाहन खुले नाट्यगृहामागील माेकळ्या मैदानात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.
शाई फेकण्याचा भाजपकडून निषेध
अकाेला: वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण केल्या जात आहे. याप्रकरणी भाजपचे खा. किरीट साेमय्या शुक्रवारी वाशिम जिल्ह्यात दाखल झाले असता काही असामाजिक तत्त्वांनी त्यांच्या वाहनावर शाई फेकली. या घटनेचा भारतीय जनता पक्षाकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी महाविकास आघाडी सरकाने दाेषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनपात अधिकारी ‘नाॅटरिचेबल’
अकाेला : जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा मनपामध्ये दरराेज दुपारी ३ नंतर दाखल हाेऊन कामकाज सांभाळत आहेत. आयुक्तांची वेळ लक्षात घेता अनेक विभाग प्रमुख व कर्मचारी कर्तव्यावर हजर राहत नसल्याचे चित्र समाेर आले आहे. दुपारी ३ नंतर अधिकारी मनपात दाखल हाेतात. यामुळे विविध कामासाठी येणाऱ्या अकाेलेकरांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
माेकाट जनावरांचा रस्त्यात ठिय्या
अकाेला : महापालिकेच्या निष्क्रिय काेंडवाडा विभागामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चाैकांमध्ये माेकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून वाहनचालकांच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. ही बाब काेंडवाडा विभाग प्रमुख, झाेन अधिकारी तसेच आराेग्य निरीक्षकांच्या निदर्शनास येत नाही का, असा संतप्त सवाल अकाेलेकरांनी उपस्थित केला आहे.