‘पोकरा’साधणार ‘रेशीम’ विकास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 06:50 PM2020-01-14T18:50:18+5:302020-01-14T18:50:23+5:30
तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून, पाच जिल्ह्यात आजमितीस तीन हजार हेक्टरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे.
अकोला: पारंपारिक शेतीला ‘रेशीम शेती’ ची जोेड देण्यासाठी रेशीम संचालनालयाने महारेशीम कार्यक्रम हाती घेतला असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, वºहाडातील शेतकऱ्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. आता ‘पोकरा’ नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेतंर्गत रेशीम शेतीला नवसंजिवनी मिळणार आहे. शेतकऱ्यांना भरपूर अनुदानही दिले जाणार आहे.रोपवाटीकेचा यामध्ये समावेश आहे.
सुरुवातीला वºहाडात चांगल्यापैकी जम बसविणाºया या रेशीम शेतीला मध्यंतरी अवकळा आली होती; परंतु पुन्हा रेशीम तयार करणाºया तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून, पाच जिल्ह्यात आजमितीस तीन हजार हेक्टरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षीही दोनशे एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा रेशीम कार्यालयांना देण्यात आले आहे.
नवीन तुती लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी अकोला जिल्ह्यातही २०० एकर तुती लागवड करण्यासाठीचे उद्दिष्ट असून,नोंदणी सुरू करण्यात आली आहे. पातूर व बाळापूर तालुक्यासह तुतीचे क्षेत्र यावर्षी वाढले असून, अकोला आणि आकोट तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनाही तुती लागवड करण्यासाठी महारेशीत मोहिमेतंर्गत प्रोत्साहन देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात यावेळी बचत गटाने तुती लागवड करावी म्हणून रेशीम मार्गदर्शन करणार आहे.
रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू केले असून, रेशीम शेती करण्यासाठी शेतकºयांनी पुढे यावे म्हणून अनुदान दिले जात आहे. तुती लागवड व इतर साहित्य खरेदीसाठी आता नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेतंर्गत भरपूर अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसाधरण शेतकºयांना तुती रोपवाटीकेसाठी यात अनुदान असून, लागवडीसाठी ३७,५००,साहित्य खरेदी ५६,२५० व किटक संगोपण मिळून १ लाख २६ हजार ४७९ रू पये अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकºयांना रोप वाटिकेसह तुती लावगडीला ४५ हजार, साहित्य खरेदी ६७,५०० मिळून १ लाख ५१ हजार ७७५ रू पये अनुदान दिले जाणार आहे.
वºहाडातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी ही कमी खर्चाची शेती करावी, यासाठी अमरावती विभागीय रेशीम शेती कार्यालयातर्फे शेतकºयांना प्रोत्साहन दिले जात असून, महारेशीत अभियानातंर्गत शेतकºयांना आणखी प्रोत्साहन दिले जात आहे.यावेळी ‘पोकरा’तंर्गत अनुदान दिले जाणार आहे.
- महेंद्र ढवळे,
सहायक संचालक,
रेशीम.