विदर्भात फुलतेय रेशीम शेती; ५ हजार एकरवर तुतीची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:48 PM2018-10-30T16:48:05+5:302018-10-30T16:48:14+5:30
अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, विदर्भ,वºहाडातील शेतकऱ्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे.
अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, विदर्भ,वºहाडातील शेतकऱ्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला वºहाडात चांगल्यापैकी जम बसविणाºया या रेशीम शेतीला मध्यंतरी अवकळा आली होती; परंतु पुन्हा रेशीम तयार करणाºया तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून,पश्चिम (वºहाड)विदर्भात पाच हजार एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान, रेशीम शेतीसाठी बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
नवीन तुती लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी अकोला जिल्ह्यात १८० एकर तुती लागवड करण्यात आली आहे. पातूर व बाळापूर तालुक्यात मर्यादित असलेले तुतीचे क्षेत्र यावर्षी वाढले आहे. अकोला आणि आकोट तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी तुती लागवड सुरू केली होती तथापि पावसाच्या अनिश्चिततेमुळे पातूर तालुक्यात कोषाचे प्लॉट वाढले नाहीत. त्यामुळे रेशीम अधिकाºयांकडून याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू केले असून, रेशीम शेती करण्यासाठी शेतकºयांनी पुढे यावे म्हणून अनुदान दिले जात आहे. तुती लागवड व इतर साहित्य खरेदीसाठी शासनाकडून अनुदान शेतकºयांना उपलब्ध करू न दिले जात असून, कीटक संगोपन व गृह बांधणीसाठी दोन लाख इतका खर्च अपेक्षित असल्याने यासाठी अनुदान देण्यात आले आहे.
वºहाडातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी ही कमी खर्चाची शेती करावी, यासाठी अमरावती विभागीय रेशीम शेती कार्यालयातर्फे शेतकºयांना प्रोत्साहन दिले जात असून, यासाठी या भागातील शेतकºयांचे अभ्यास दौरेही करण्यात आले आहेत.
भरघोस उत्पादन देणारी शेती
निसर्गात पाच प्रकारच्या रेशीम अळ्या आढळतात. यापासून निर्माण होणारा रेशीम धागा अतिशय लोकप्रिय असून, त्याला मिळणारी किंमतही भरपूर असल्याने शेतकºयांनी रेशीम उत्पादनाकडे वळावे, असा शासनाचा प्रयत्न आहे. कमी खर्चाचा हा जोडधंदा असल्याने शेतकरी या शेतीकडे वळला आहे.