अंदुरानजीकच्या पुलावर साचला गाळ; अंदूरा-सोनाळा मार्ग ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:19 AM2021-07-28T04:19:37+5:302021-07-28T04:19:37+5:30

परिसरातील हाता, अंदुरा, सोनाळा परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोर्णा, पाणकास नदीला आलेल्या पुरामुळे शेतीजमीन ...

Silt on a bridge near Anduran; Andura-Sonala road jammed! | अंदुरानजीकच्या पुलावर साचला गाळ; अंदूरा-सोनाळा मार्ग ठप्प!

अंदुरानजीकच्या पुलावर साचला गाळ; अंदूरा-सोनाळा मार्ग ठप्प!

Next

परिसरातील हाता, अंदुरा, सोनाळा परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोर्णा, पाणकास नदीला आलेल्या पुरामुळे शेतीजमीन खरडून गेली. तसेच विद्युत खांबही वाहून गेले आहेत. अंदुरा-सोनाळा मार्गावरील पुलावर प्रवाहातील गाळ जमा झाल्याने मार्ग बंद पडला आहे. याबाबत माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पुलावरील गाळ काढून मार्ग पूर्ववत सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी अभियंत्याशी संपर्क केला असता त्यांनी गाळ काढून मार्ग पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, मंगळवार दुपारपर्यंतही गाळ हटविण्यात आला नव्हता. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बावने, पंचायत समिती सदस्य गजानन उगले, अंदुरा येथील सरपंच गणेश बेंडे, हाता येथील सरपंच श्याम मनसुटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन शिराळे, पुरुषोत्तम अहीर, उपसरपंच संजय वानखडे, भूषण पातोडे, सुहास इंगळे, सुभाष तायडे, प्रभू अवारे, सुभाष इंगळे, धम्मपाल तायडे, ज्ञानेश्वर पाचपोहे, संजय पाटील, श्याम वराळे, गुड्डू भारसाकळे, किशोर बोदडे, गणेश जसताप, विलास दामोदर, सागर दामोदर, सिद्धार्थ दामोदर, किशोर तायडे, संदीप वानखडे, अक्षय वानखडे, आकाश उमाळे, अरविंद वानखडे, शांतशील तायडे, अशोक उगले, आनंद गवारगुरु आदी उपस्थित होते.

‘वंचित’ने दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

हाता, अंदुरा, सोनाळा परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून आर्थिक मदत द्यावी, तसेच पुलावरील गाळ हटवून मार्गावरील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मागणी पूर्ण न झाल्यास ‘वंचित’कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष देंडवे यांनी दिला.

260721\5609img-20210724-wa0038.jpg

अंदुरा सोनाळा मार्गातील मोर्णा नदीच्या पुलावरील गाळ

Web Title: Silt on a bridge near Anduran; Andura-Sonala road jammed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.