पिंपळखुटा येथे महाशिवरात्री साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:47+5:302021-03-15T04:17:47+5:30
------------------------------------ परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी अकोट: अति पाऊस व परतीच्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पिकांचे नुकसान झाले आहे. ...
------------------------------------
परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी
अकोट: अति पाऊस व परतीच्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पादनात घटल्याने शेतकऱ्यांचा लागवडी खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
----------------------------------
स्कूल चालकांवर उपासमारीची वेळ
मूर्तिजापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल बसही बंद असून, स्कूल बस मालक व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने स्कूल बसबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
-------------------------
बाळापूर तालुक्यात रोहित्रांची दुरवस्था
बाळापूर: तालुक्यातील अनेक गावांमध्ये कृषी व घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रांची दुरवस्था झाली असून, रोहित्राची संचपेटी उघड्यावर आहे. त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
-----------------------
पक्ष्यांसाठी जलपात्र ठेवण्याचे आवाहन
पातूर: मार्चच्या पूर्वार्धात उन्हाची दाहकता वाढत आहे. पक्ष्यांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पक्ष्यांसाठी घराच्या छतावर जलपात्र ठेवण्याचे आवाहन येथील पक्षीप्रेमींकडून होत आहे.
--------------------------
रोजगार हमी योजनेंतर्गत कामे उपलब्ध करण्याची मागणी
बार्शीटाकळी: तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रब्बी हंगाम संपत आल्याने नागरिकांच्या हाताला काम नसल्याचे चित्र आहे.
---------------------------
विवाह सोहळ्यात नियमांचे उल्लंघन
बाळापूर : मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यावर बंधने घालण्यात आली आहेत; परंतु बाळापूर तालुक्यातील शहरी, ग्रामीण भागात घरगुती स्वरूपात होणाऱ्या विवाह सोहळ्यात ५० पेक्षा अधिक नागरिक एकत्रित येत असून, सूचनांचेही उल्लंघन केले जात असल्याचे चित्र आहे.