पातुरात महाशिवरात्री उत्सव साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:03+5:302021-03-13T04:34:03+5:30

महाशिवरात्रीच्या पर्वावर काशी कवळेकर भजन मंडळाने अखंड भजन शिवाचा गजर करण्यात आला. दरवर्षी कवळेश्वर भजन मंडळातर्फे भाविकांना सात ...

Simply celebrate Mahashivaratri festival in Patura | पातुरात महाशिवरात्री उत्सव साधेपणाने साजरा

पातुरात महाशिवरात्री उत्सव साधेपणाने साजरा

Next

महाशिवरात्रीच्या पर्वावर काशी कवळेकर भजन मंडळाने अखंड भजन शिवाचा गजर करण्यात आला. दरवर्षी कवळेश्वर भजन मंडळातर्फे भाविकांना सात ते आठ क्विंटल उसळचे वाटप करण्यात आले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. कवळेश्वर महादेवाचे मंदिर हे शहरापासून सुमारे तीन किमी अंतरावर दक्षिणेकडे आहे. मंदिर अति पुरातन असून, याठिकाणी पराशर मुनीचे वास्तव्य होते, तर मंदिराला लागूनच चक्रधर स्वामी यांच्या चरणांकित पादुका आहेत. त्यामुळे दरवर्षी येथे भाविकांची गर्दी राहते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्यात उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी भूविकास बँकेचे व्यवस्थापक स्वर्गीय दत्तात्रय गिरोळकर, नामदेव फुलारी, श्यामराव गिरे, प्रल्हाद यादव, लक्ष्मण गुजर, गजानन सातव, सुरेश कोथळकर, पंजाबराव सुरवाडे, जयवंत पुरुषोत्तम, भानुदास तेजवाल, रामभाऊ ढगे, बंडू पाटील, जयराम सातव, कांशीराम गवई आदींनी दर सोमवारी हरी नामाची आणि आरतीची पंचपदीचे परंपरा चाळीस वर्षांपूर्वी सुरू केली होती, ती परंपरा आजही सुरू आहे. (फोटो)

---------------------------------------------------------

खिरपुरी बु. येथे महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिलांना मार्गदर्शन

खिरपुरी बु: समृद्धी महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत खिरपुरी बु, खिरपूरी खु. येथे गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना उद्योग, पारसबाग व कोरोनाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी घनश्याम धनोकार व गोपाल भाकरे यांनी मार्गदर्शन केले.

येथे समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नवीन घरकूल भूमिपूजन सरपंच रोहिणी कावडकर, उपसरपंच वंदना शिरसाट, ग्रामसंघाच्या अध्यक्षा जयश्री राधाकृष्ण दांदळे, सचिव सोनू शिरसाट, कोषाध्यक्ष सुनीता मानकर यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमात घरकूल लाभार्थी बांधणी करणे, उत्पादनाची माहिती देऊन त्या मालाबद्दल बाजारपेठ उपलब्ध करून देणे व महिला समूहाचे भरपूर उत्पन्न वाढवणे, अस्मिता प्लस योजनेबद्दल जनजागृती करणे, स्वयं सहायता समूह निधीचे वितरण करणे, परसबाग याविषयी जनजागृती करण्यात आले. यावेळी साधन व्यक्ती अश्विनी चंद्रकांत दांदळे, आरती किसना पळसकार, भावना चिंचोलकार, शीला मसने,योगिता दांदळे, संगीता दांदळे, कल्पना दांदळे, रोहिणी सोनवणे, शीतल कावडकार, आम्रपाली गवई, अनिता राऊत, सविता कवडकार, पुष्पा आखरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (फोटो)

Web Title: Simply celebrate Mahashivaratri festival in Patura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.