जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशक फवारणीचे नियोजन रेंगाळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:39 AM2020-07-27T11:39:37+5:302020-07-27T11:39:49+5:30
जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन रेंगाळले आहे.
अकोला : पावसाळ्यात साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमत्र्यांनी १० दिवसांपूर्वी संबंधित यंत्रणांना दिले होते; मात्र यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून अद्याप नियोजन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन रेंगाळले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रमकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्ह्यातील नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना दिले होते.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानंतर १४ दिवसांचा कालावणी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन अद्याप संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन संबंधित यंत्रणांकडून केव्हा करण्यात येणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन लवकरच
करण्यात येणार आहे.
-डॉ. सुरेश आसोले
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.