स्वयंपाकाचे साहित्य घेऊन त्रस्त कुटुंबीयांचा तेल्हारा नगर परिषदेत ठिय्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:33 AM2021-02-06T04:33:06+5:302021-02-06T04:33:06+5:30
तेल्हारा : शहरातील जिजामातानगरातील नालीचे पाणी घरात शिरत असल्याने थेटे कुटुंबीयांनी नगर परिषदेकडे नाल्याची दुरुस्ती करून सांडपाण्याची समस्या सोडविण्याची ...
तेल्हारा : शहरातील जिजामातानगरातील नालीचे पाणी घरात शिरत असल्याने थेटे कुटुंबीयांनी नगर परिषदेकडे नाल्याची दुरुस्ती करून सांडपाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली होती. वारंवार पाठपुरावा करूनही समस्या ‘जैसे थे’ असल्याने थेटे कुटुंबीयांनी नगर परिषद कार्यालयात धाव घेत शुक्रवार, दि.५ फेब्रुवारी रोजी ठिय्या मांडला. यावेळी मुख्याधिकारी पवार व नगराध्यक्षांनी समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जिजामातानगरमधील अनिल रामराव थेटे यांच्या घरासमोरील नालीचे सांडपाणी घरात शिरत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे नालीची दुरुस्ती करून पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी करीत थेटे यांनी अनेकदा नगर परिषदेत चकरा मारल्या. निवेदने देऊन समस्या ‘जैसे थे’ असल्याने आपण नगरपालिकामध्ये वास्तव्यास येणार असल्याचे यापूर्वी थेटे यांनी नगर परिषदेला कळविले होते. त्यामुळे अखेर शुक्रवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी थेटे कुटुंब बाज व स्वयंपाकाचे साहित्य घेऊन नगर परिषदेत गेले. यावेळी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक यावेळी यांनी नगर परिषदेच्या प्रशासनाला जाब विचारला. त्यावर मुख्याधिकारी पवार व नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी तोडगा काढून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. (फोटो)