अकोटात भरदिवसा दरोडा टाकणारे सहा आरोपी जेरबंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:23 AM2021-09-04T04:23:26+5:302021-09-04T04:23:26+5:30

अकोट : शहरात भरदिवसा घरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना शहर पोलिसांनी दि. ३ सप्टेंबर रोजी जेरबंद केले आहे. व्यापारी ...

Six accused arrested in Akota for daytime robbery | अकोटात भरदिवसा दरोडा टाकणारे सहा आरोपी जेरबंद !

अकोटात भरदिवसा दरोडा टाकणारे सहा आरोपी जेरबंद !

Next

अकोट : शहरात भरदिवसा घरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना शहर पोलिसांनी दि. ३ सप्टेंबर रोजी जेरबंद केले आहे. व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या घरी स्वयंपाक करणारी महिलाच दरोड्याचे पूर्व नियोजन करणारी असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांचे ७२ तासांचे यशस्वी तपासात सहा आरोपी व मुद्देमाल जप्त केल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

शहरात कोरोनाचा लसीकरण सर्व्हे असल्याचा बनाव करुन दरोडा टाकणारे आरोपीचे मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी शहरावर लक्ष केंद्रित केले होते. घरातील परिस्थिती लक्षात घेत घटनास्थळापासून सीसी कॅमेऱ्याचे फुटेजची तपासणी करीत संशयास्पद हालचाली टिपल्या. चोरीला गेलेला मोबाइल तसेच परिसरात त्या कालावधीमधील वापर झालेल्या संशयास्पद मोबाइलनंबर संपर्क नेटवर्क लोकेशन, पळून जाताना वापरलेल्या वाहनाचा नंबर शोध घेत आरोपीचे कपड्याचे व शरीरयष्टीचे वर्णन करीत पोलीस गोपनीय माहिती काढत लक्ष ठेवून आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दरोड्याचा घटनाक्रम उघड करत गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींमध्ये विठ्ठल नामदेव टवरे, त्यांची पत्नी वैशाली विठ्ठल टवरे (रा.शिवाजीनगर, मोठे बारगण, अकोट), संगम गणेशराव ठाकरे त्यांची पत्नी अमृता संगम ठाकरे, भाऊ सागर गणेशराव ठाकरे (रा. येवदा, जि. अमरावती) (हल्ली मुकाम कबुतरी मैदान, अकोट) तर सीमा विजय निंबोकार (रा.नरसिंग कॉलनी, अकोट) यांना ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अटक करण्यात आली आहे. त्यांनी दर्यापूर मार्गिवर फेकलेला मोबाइल व दोन हजार ७०० रुपये रोख रक्कम जप्त केली. या गुन्ह्यात एक विधीसंघर्षित मुलाचा सहभाग असल्याने निष्पन्न झाल्याने बाल न्यायमंडळ येथे हजर राहण्याबाबत नातेवाइकांना समजपत्र देण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, प्रभारी एसडीपीओ संजीव राऊत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, डीबी स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, रत्नदीप पळसपगार, गणेश पाचपोर, चंद्रकांत ठोबंरे, सपोउपनि रणजित खेडकर, पोलीस कर्मचारी विलास मिसाळ, उमेश सोळंके, उमेश पराये, राजेश वसे, सुलतान पठाण, गोपाल अघडते, गोपाल बुंदे, विजय चव्हाण, विजय सोळंके, दिलीप वाठोरे, दिलीप तायडे, वसीम शेख, संजय डोंगरदिवे, अंकुश डोबाळे, विशाल दांदळे, विठ्ठल चव्हाण, जवरीलाल जाधव, उदय शुक्ला, अंकुश डोबाळे, संतोष कोकाटे, सुनीता डाहे, उमा बुटे, सायबरचे प्रशांत संदे, गणेश सोनोने, गोपाल ठोबंरे यांनी केली.

Web Title: Six accused arrested in Akota for daytime robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.