रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणात डॉक्टरसह सहा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:33+5:302021-05-05T04:29:33+5:30
आरोपींची संख्या पोहोचली १८ वर सहा आरोपींना ०७ मेपर्यंत पोलीस कोठडी अकोला : राज्यभर रेमडेसिविर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात ...
आरोपींची संख्या पोहोचली १८ वर
सहा आरोपींना ०७ मेपर्यंत पोलीस कोठडी
अकोला : राज्यभर रेमडेसिविर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. या काळाबाजार प्रकरणात पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल १८ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. यामध्ये दर्यापूर येथील डॉक्टरसह सहा आरोपींना शनिवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रेमडेसिविरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील डॉक्टर सागर सहदेव मेश्राम (वय २३) यास अटक केली. मेश्राम याचे साथीदार असलेले आनंदराम अभिलाश तिवारी (वय २२) रा. कैलास टेकडी, सुमित महादेव वाघमारे रा. शंकर नगर, कोमल वानखडे रा. सुधीर कॉलनी या चार आरोपींना अटक केली. तसेच या प्रकरणाचा तपास करीत असताना निकिता नारायण वैरागडे रा. डाबकी रोड व शिवनगर येथील रहिवासी कार्तिक मोहन पवार (वय २५) या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सहाही आरोपींना ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत १८ आरोपींना अटक केली असून सुमारे ३० पेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात विकल्याचा उलगडा या आरोपींकडून झालेला आहे. तर या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हे आहेत १८ आरोपी
डॉ. सागर सहदेव मेश्राम रा. येवदा, आनंदराम अभिलाश तिवारी, सुमित महादेव वाघमारे, कोमल वानखडे, अंकित संतोष तिकांडे, रा. मोठी उमरी, देवेंद्र संजय कपले, रा. मोठी उमरी, शुभम दिनेश वराडे, रा. लाडीज फैल, निकिता नारायण वैरागडे, रा. डाबकी रोड, अभिषेक जगदीश लोखंडे रा. मोठी उमरी, कार्तिक मोहन पवार रा. शिवनगर, गौतम नरेश निधाने, रा. शिवाजी नगर, आशिष समाधान मते, राहुल गजानन बंड रा. भारती प्लॉट जुने शहर, सचिन हिंमत दामोदर रा. अशोक नगर अकोट फैल, प्रतीक सुरेश शहा, रा. रामनगर, अजय राजेश आगरकर, रा. बाळापूर नाका, सोनल फ्रान्सिस मुजमुले रा. लहरिया नगर व मंगेश प्रभाकर राऊत रा. इंजिनिअरिंग कॉलनी मोठी उमरी या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.