२३ वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघात अकोल्याचे सहा खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 01:23 PM2019-12-08T13:23:49+5:302019-12-08T13:27:32+5:30

कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेकरिता २३ वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे.

Six Akola players in the Vidarbha cricket team under 23 year | २३ वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघात अकोल्याचे सहा खेळाडू

२३ वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघात अकोल्याचे सहा खेळाडू

googlenewsNext
ठळक मुद्दे स्पर्धा ११ डिसेंबर २०१९ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत होणार आहे.कर्णधारपदी अथर्व तायडे याची निवड झाली आहे.अकोल्याच्या या सहाही खेळाडूंची कौतुक ास्पद कामगिरी राहिली.

अकोला: कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेकरिता २३ वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. यामध्ये अकोल्यातील सहा खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधारपदी अथर्व तायडे याची निवड झाली आहे. स्पर्धा ११ डिसेंबर २०१९ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत होणार आहे.
यापूर्वी अथर्वने १४,१६ व १९ वर्षांखालील विदर्भ संघाने प्रतिनिधित्व केले. तसेच १९ व २३ वर्षीय भारतीय संघाचेसुद्धा प्रतिनिधित्व केले. रणजी आणि इराणी ट्रॉफीचेसुद्धा प्रतिनिधित्व केले. मध्यमगती गोलंदाज तथा आक्रमक फलंदाज अष्टपैलू दर्शन नळकांडे याने यापूर्वी १४,१६,१९,२३ वर्षांखालील विदर्भ संघ, १९ वर्षांखालील भारतीय संघ, रणजी ट्रॉफी स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षी आयपीएल स्पर्धेतही प्रवेश मिळविला. मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे याने यापूर्वी १६ व १९ वर्षांखालील विदर्भ संघ तसेच न्यूझीलंड येथे झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यावर्षी २३ वर्षांखालील भारतीय संघाचेदेखील प्रतिनिधित्व केले. यष्टिरक्षक तथा फलंदाज पवन परनाटे यापूर्वी २३ वर्षांखालील विदर्भ संघ, अमरावती विद्यापीठ तसेच विझी ट्रॉफीत प्रतिनिधित्व केले. शैलीदार फलंदाज आणि फिरकीपटू नयन चव्हाण याने यापूर्वी १४,१६,१९ व २३ वर्षांखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले. १९ वर्षांखालील भारतीय रेड संघाचेदेखील प्रतिनिधित्व केले. शैलीदार फलंदाज तथा फिरकीपटू मोहित राऊतने यापूर्वी अमरावती विद्यापीठाचे तसेच २३ वर्षांखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले. सीझन २०१८-१९ मध्ये २३ वर्षांआतील विदर्भ संघाने बीसीसीआय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. विशेष म्हणजे, या संघात अकोल्याच्या या सहाही खेळाडूंची कौतुक ास्पद कामगिरी राहिली. अजिंक्य ठरलेल्या विदर्भ संघात एकाच क्लबच्या सहा खेळाडूंची निवड ही अकोला जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब आहे. या खेळाडूंची कामगिरी अकोल्यातील नवोदित व युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, असे मत व्हीसीएचे जिल्हा संयोजक तथा अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी व्यक्त केले.

संघामध्ये अकोला क्रिकेट क्लबचे खेळाडू अथर्व तायडे, दर्शन नळकांडे, आदित्य ठाकरे, पवन परनाटे, नयन चव्हाण, मोहित राऊत यांचा समावेश आहे. सलामीला खेळणारा डावखुरा फलंदाज अथर्व तायडेच्या नेतृत्वात १९ वर्षांआतील विदर्भ संघाने पहिल्यांदा १९ वर्षांखालील बीसीसीआय स्पर्धेत संपूर्ण भारतातून अजिंक्यपद प्राप्त केले होते.

Web Title: Six Akola players in the Vidarbha cricket team under 23 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.