भारतीय संघाच्या निवड चाचणीमध्ये अकोल्याचे सहा बॉक्सर
By रवी दामोदर | Published: November 7, 2023 06:58 PM2023-11-07T18:58:54+5:302023-11-07T18:59:05+5:30
अरमनिया येथे होणाऱ्या विश्व बॉक्सिंग स्पर्धेकरीता होणार नियुक्ती
अकोला : हरियाणा राज्यातील रोहतक येथे भारतीय बॉक्सिंग स्पर्धेची निवड चाचणी दि.७ ते १० नोव्हेंबर दरम्यान पार पडत आहे. या निवड चाचणीकरीता अकोल्यातील सहा बॉक्सरांची निवड झाली आहे. त्यामध्ये पाच महिला व एका पुरुष बॉक्सरचा समावेश आहे. स्पर्धेमध्ये भारतीय संघात निवड झाल्यास तो खेळाडू अरमनिया येथे होणाऱ्या ज्युनिअर विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दावेदारी सादर करणार आहे. भारतीय संघाच्या निवड चाचणी अकोला क्रीडा प्रबोधनीचे सहा खेळाडूंची निवड झाल्याने ही बाब अकोलेकरांसाठी भुषणीय आहे.
रोहतक येथे विश्व बॉक्सिंग चॅम्पीयनशीपसाठी भारतीय संघाची निवड चाचणी सुरू आहे. त्यामध्ये अकोला क्रीडा प्रबोधनीचे ४८ किलो वजन गटात रवींद्र पाडवी, समिक्षा सोलंकी, पलक झामरे, रेवती उंबरकर, पूर्वा गावंडे, भक्ती आदींचा समावेश आहे. त्यांच्यासोबत प्रशिक्षक गजानन कबीर, दिया बचे हे असून, पंच म्हणून अक्षय टेम्बूनीकर हे महाराष्ट्राचे प्रतिनीधीत्व करणार आहेत. सर्व बॉक्सर जिल्हा क्रीडा अधिकारी तथा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.