शेतकरी आत्महत्यांची सहा प्रकरणे मदतीसाठी पात्र!
By admin | Published: March 7, 2017 02:18 AM2017-03-07T02:18:25+5:302017-03-07T02:18:25+5:30
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची सहा प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली.
अकोला, दि. ६- शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची सहा प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, चार शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली.
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हय़ातील शेतकरी आत्महत्यांच्या १0 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील एकनाथ रामराव बोरकर, मूर्तिजापूर तालुक्यातील बिडगाव येथील आनंदा रामकृष्ण वानखडे, तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील रामरतन सेवकराम दातकर, पातूर तालुक्यातील सावरखेड येथील गोविंदा सीताराम झळके, अकोला तालुक्यातील कानशिवणी येथील विजय रामेश्वर वाघमारे व निंबी मालोकार येथील नितीन प्रकाश इंगळे इत्यादी सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित चार शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीला समितीचे सदस्य शिवाजीराव देशमुख, डॉ. प्रमोद चोरे, डॉ. बाबाराव शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.