सहा गुन्हेगार जिल्हय़ातून तडीपार; एसडीओंचा आदेश
By admin | Published: February 19, 2016 02:10 AM2016-02-19T02:10:08+5:302016-02-19T02:10:08+5:30
अकोला उपविभागीय अधिका-याचे आदेश.
अकोला: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सहा गुन्हेगारांना जिल्हय़ातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी बुधवारी दिला. त्यामध्ये तीन गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तर तीन गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले. अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने, विविध गुन्हे दाखल असलेल्या सहा गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागामार्फत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकार्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार अकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत शुभम हरी सावंत, राहुल ऊर्फ सोनू ओंकार त्रिपाठी, आशीष ओहळ या तीन गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तर रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत वीरेंद्र ऊर्फ भुर्या अमरजितसिंग रोहेल, प्रशांत ऊर्फ गोलू अशोक माने व खदान पोलीस ठाणे अंतर्गत जगदीश विश्वनाथ माने या तीन गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले. यासंबंधीचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी पारित केला.