अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी मिळाला म्हणून पाच शेतकऱ्यांनी घेतला विषाचा घोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 04:57 PM2019-08-05T16:57:39+5:302019-08-05T17:23:08+5:30

सहा शेतकऱ्यांनी सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकाºयांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी घडली.

Six farmers consume poison in upper district collector's cabin in Akola | अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी मिळाला म्हणून पाच शेतकऱ्यांनी घेतला विषाचा घोट

अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी मिळाला म्हणून पाच शेतकऱ्यांनी घेतला विषाचा घोट

Next

अकोला : महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमीनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने गत अनेक वर्षांपासून शासनदरबारी लढा देत वाढीव मोबदल्याची मागणी करणाºया बाळापूर तालुक्यातील पाच शेतकºयांनी सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकाºयांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी घडली. विष प्राशन केलेल्या  शेतकºयांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सद्या उपचार सुरु आहेत.
मुरलीधर राऊत (४२, शेळद), मदन हिवरकार (३२, कान्हेरी गवळी),साजिद इक्बाल शे. मोहम्मद (३०, बाळापूर), मो. अफजल गुलाम नबी (३०, बाळापूर) आणि अर्चना टकले (३०, बाळापूर) या शेतकºयांची जमीन महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. अधिग्रहित झालेल्या जमीनीचा मोबदला इतर शेतकºयांपेक्षा कमी मिळाला म्हणून उपरोक्त शेतकरी गत अनेक वर्षांपासून शासन दरबारी लढा देत आहेत. वाढीव मोबदला मिळावा, म्हणून त्यांनी २९ जुलै रोजीच जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन आत्महत्येचा इशारा दिला होता.   सोमवारी यांची अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कशात सुनावणी सुरू होती. सुनावणी नंतर अप्पर जिल्हाधिकारी लोणकर यांनी तुम्हाला दिलेला मोबदला योग्य आहे. तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा, असे म्हटल्यानंतर या पाच  शेतकऱ्यानी त्यांच्या समोर सोबत आणलेले किटकनाशक प्राशन केले.
 हे  शेतकरी सोमवारी दुपारी अप्पर जिल्हाधिकारी लोणकर यांना भेटावयास गेले होते. शासनाने अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी  तेथे उपस्थित कर्मचाºयांनी या  शेतकºयांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

Web Title: Six farmers consume poison in upper district collector's cabin in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.