शासकीय महिला राजगृहातून सहा मुलींचे पलायन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 11:20 AM2020-10-17T11:20:48+5:302020-10-17T11:24:36+5:30
Girls Ran away from Womens Hostel in Akola सहाही मुली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून साडीच्या साहाय्याने खाली उतरल्याची माहिती आहे.
अकोला : शहरातील खडकी परिसरातील शासकीय जागृती महिला राजगृहातून सहा मुलींनी शनिवारी मध्यरात्रीनंतर पलायन केले. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, महिला व बाल विकास विभागांतर्गत खडकी परिसरात शासकीय जागृती महिला राजगृह आहे. यातील सहा मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या सहाही मुली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून साडीच्या साहाय्याने खाली उतरल्याची माहिती आहे. यासंदर्भात शासकीय जागृती महिला राजगृहाच्या अधिकाऱ्यांमार्फत खदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलीस घटनेचा तपास करीत आहे. या ठिकाणी शासकीय योजनेतून हरवलेल्या व ज्यांना कुटुंबाचा आधार नाही, अशा मुलींच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हरवलेल्या मुलींना आधार
महिला व बाल विकास विभागांतर्गत खडकी परिसरात शासकीय जागृती महिला राजगृह येथे हरवलेल्या तसेच ज्यांना कुटुंबाचा आधार नाही, अशा मुलींना राहण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी शासकीय योजनेतून त्यांचे पालन केले जाते.