सहा गुंड सहा महिन्यांसाठी, तिघे वर्षभरासाठी तडीपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:42 PM2019-01-01T12:42:37+5:302019-01-01T12:42:42+5:30
अकोला: शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ नुसार सोमवारी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.
अकोला: शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ नुसार सोमवारी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. यात सहा गुंड सहा महिन्यांसाठी तर तिघांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड प्रवृत्तीचा प्रवीण ऊर्फ अॅटा गोपाल इंगळे, गोपी दुर्गाप्रसाद शर्मा, अर्जुन शिवकुमार तिवारी या तिघांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यांतर्गत गुंड सुनील सहदेव तायडे, अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत गुंड भास्कर प्रकाश जयपुरे, शेषराव भिवाजी खवले, सिव्हिल लाइन स्टेशन हद्दीतील शेख सलीम शेख सुलतान, जुने शहरातील सैयद मकसूद सैयद हबीब, सैयद उमेर शकील अहमद या सहा जणांना सहा महिन्यांसाठी तडीपार केले तर अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड सनी गोरख मोरे याला तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. (प्रतिनिधी)