कर्तव्य करतानाच सहाशे आशा वर्कर्सने पाळला निषेध दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:21 PM2020-04-22T17:21:29+5:302020-04-22T17:31:52+5:30

अकोला जिल्ह्यातील ६०० आशा वर्कर्सने आपल्या कर्तव्यावर राहून निषेध दिन पाळला.

Six hundred Asha workers observed the protest day while on duty | कर्तव्य करतानाच सहाशे आशा वर्कर्सने पाळला निषेध दिन

कर्तव्य करतानाच सहाशे आशा वर्कर्सने पाळला निषेध दिन

Next

अकोला : संपूर्ण देशभरात सीआयटीयू ट्रेड युनियनने देशव्यापी २१ एप्रिल रोजी आंदोलन छेडले होते. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ६०० आशा वर्कर्सने आपल्या कर्तव्यावर राहून निषेध दिन पाळला.
स्थलांतरित कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करा,आयकर लागू नसणाऱ्या सर्व कुटुंबांना ७५००० रुपये रोख हस्तांतरीत करा, कोरोना सर्वेक्षण करणाºया किमान शंभर रुपये प्रती दिवस द्या, अशा मागण्या करण्यात आल्या. आशा वर्कसच्या मानधनात वाढ करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने जीआर काढला; मात्र आलेल्या शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. कोरोना महामारीच्या संकटात आशा वर्कर्स कोविड -१९ योद्धा म्हणून राज्यात जीव धोक्यात घालून कार्य करीत आहे; मात्र त्यांच्या मागण्यांकडे शासन पाठ फिरवित आहे. याचा निषेध करण्यात आला. मोरगाव सादिजन, रूईखेड आयुर्वेदिक दवाखाना येथे हातात फलक घेऊन निषेद नोंदविला गेला.

-राजकीय नेते मंडळी केवळ भाषण देऊन आश्वासन देत आहे. आम्हाला आता भाषण नको, रेशन आणि वेतन हवे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशा साधनांची व्यवस्था करा.
-संध्या दिवारे, आशा वर्कर्स, युनियन पदाधिकारी, अकोला.

 

Web Title: Six hundred Asha workers observed the protest day while on duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला