अकोला जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा बळी, ४४८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 10:18 AM2021-04-17T10:18:08+5:302021-04-17T10:18:18+5:30
coronavirusnews : शुक्रवारी कोरोनाचे आणखी सहा बळी गेले असून, ४४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
अकोला: जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, गत महिनाभरापासून मृत्यूचे सत्रही सुरूच आहे. शुक्रवारी कोरोनाचे आणखी सहा बळी गेले असून, ४४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये १४४ अहवाल रॅपिड, तर ३०४ अहवाल आरटीपीसीआर चाचणीचे आहेत. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये महसूल कॉलनी येथील ६० वर्षीय महिला, अकोट फाईल येथील ५८ वर्षीय पुरुष, तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील सराळा येथील ५५ वर्षीय महिला, वाशीम बायपास येथील ९० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ४५ वर्षीय एका अनोळखी रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. या रुग्णास १५ रोजी मृतावस्थेतच दाखल करण्यात आले होते. सायंकाळी वाडेगाव येथील ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूचे सत्र सुरू असताना शुक्रवारी ४४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये मोठी उमरी येथील १६, पारस आणि डाबकी रोड येथील प्रत्येकी १०, कौलखेड, खडकी, गोरक्षण रोड, भरतपूर येथील प्रत्येकी सात, मलकापूर, जीएमसी येथील प्रत्येकी सहा, जुने शहर पाच, जुने आरटीओ ऑफिस चार, बार्शीटाकळी, व्हीएचबी कॉलनी, कीर्तीनगर, कळंबा बु., राऊतवाडी, जठारपेठ, तापडीया नगर, सालतवाडा, रामनगर, राहेर, तुकाराम चौक येथील प्रत्येकी तीन, आदर्श कॉलनी, गुडधी, पिंपळेनगर, बाळापूर, कोठारीवाटिका, तोष्णीवाल ले आऊट, कृषी नगर, शास्त्री नगर, मूर्तिजापूर, सिंधी कॅम्प, मासा, तांदळी, महाकाली नगर, वानखडे नगर, अकोट, गीतानगर, कलेक्टर कॉलनी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित जांभळून, मिर्जापूर, आझाद कॉलनी, लक्ष्मी नगर,बंजारा नगर, पक्की खोली, गायगाव, गौतमनगर, द्वारकानगरी, राधाकिसन प्लॉट, डोंगरगाव, रामनगर, घुसर, खेतान नगर, बोरगाव मंजू, कान्हेरी गवळी, आंबोरा, शिवनी, खिरपुरी, कोळासा, अडोळ बु., जवाहरनगर, वृंदावन नगर, विजोरा, दुर्गाचौक, गोकुळपेठ, हातगाव, ज्योतीनगर, इंदिरानगर, सिटी कोतवाली, कान्हेरी सरप, शिवसेना वसाहत, आळशी प्लॉट, कुंभारी, निंभोरा, पत्रकार कॉलनी, शिवाजी नगर, विजय नगर, केशव नगर, गजानन नगर, वाशींबा, हरिहरपेठ, किल्ला चौक, कार्ला, हाता, चांदूर, बाजोरियानगर, मानकी, उगवा, सावंतवाडी, कपिलवस्तू नगर, नायगाव, राधाकिसन प्लॉट, महसूल कॉलनी, म्हैसांग, रिधोरा, छोटी उमरी, पिंपळखुटा, पातूर, घनेगाव, वरुड, देवळी, बोथडी, ताथोड नगर, विजय नगर, वस्तापूर, पळसोबढे, शिवाजी पार्क, आडगाव, लाहोरी, बळवंत कॉलनी, कापशी, पार्वती नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालात पिंजर येथील सात, अकोट येथील पाच, मूर्तिजापूर, मलकापूर येथील प्रत्येकी चार, बार्शीटाकळी येथील तीन, हरिहर पेठ, कामा प्लॉट, राधाकिसन प्लॉट. पातूर, राही, मोठी उमरी, कौलखेड, चोहोगाव, लोहगड, शास्त्री नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित लहरिया नगर, भागवत प्लॉट, अमानखा प्लॉट, कोळंबी, सांगवा मेळ, माना, कलेक्टर कॉलनी, नित्यानंद नगर, मोठी उमरी, कपिलेश्वर, हिंगणा रोड, राधेय अपार्टमेंट, संतोष नगर, कातखेड, वरुर जवुळका, बालाजी नगर, व्याळा, गिरीनगर, सोनटक्के प्लॉट, चिखलगाव, गोरक्षण रोड, जठारपेठ, महात्मा फुले नगर, विझोरा, आळंदा, खडकी, दहिहांडा, राजंदा, मजलापूर, जीएमसी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
४५५ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी ४५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून यापैकी ३४० गृह विलगीकरणातील आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४०५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.