आणखी सहाजणांचा मृत्यू, २९० नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:19 AM2021-04-04T04:19:02+5:302021-04-04T04:19:02+5:30
येथील सहाजणांचा झाला मृत्यू शनिवारी सहा मृत्यूंची नोंद झाली. मलकापूर, अकोला येथील ६५ वर्षीय महिला, पिंजर (ता. बार्शीटाकळी) येथील ...
येथील सहाजणांचा झाला मृत्यू
शनिवारी सहा मृत्यूंची नोंद झाली. मलकापूर, अकोला येथील ६५ वर्षीय महिला, पिंजर (ता. बार्शीटाकळी) येथील ७२ वर्षीय पुरुष, निंबा (ता. बाळापूर) येथील ७५ वर्षीय पुरुष, जुने शहर, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुष, बार्शीटाकळी येथील ६७ वर्षीय पुरुष व पिंपळखुटा (ता. अकोट) येथील ६० वर्षीय पुरुष अशा सहाजणांचा शनिवारी मृत्यू झाला.
५९३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, आयकॉन हॉस्पिटल येथील तीन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, बिहाडे हॉस्पिटल येथील नऊ, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील एक, यकीन हॉस्पिटल येथील चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, नवजीवन हॉस्पिटल येथील सहा, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, आधार हॉस्पिटल, मूर्तिजापूर येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथील तीन, बाईज हॉस्टेल अकोला येथील दोन, अवघाते हॉस्पिटल येथील एक, ओझोन हॉस्पिटल येथील सात, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, तर होम आयसोलेशन येथील ५२० अशा एकूण ५९३ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४,७१५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८,५६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांपैकी तब्बल २३,३८२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४६८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,७१५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.