सहा पंचायत समित्यांचे बीडीओ जिल्ह्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:03 PM2019-08-07T14:03:11+5:302019-08-07T14:03:25+5:30
अकोला : ग्रामविकास विभागाने गेल्या काही दिवसात गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला. ...
अकोला: ग्रामविकास विभागाने गेल्या काही दिवसात गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील तीन गटविकास अधिकाऱ्यांची बदली केली असून, त्यांच्या जागेवर कोणालाही दिले नाही. त्यामुळे आता सहा पंचायत समित्या गटविकास अधिकाºयांशिवाय राहणार आहेत. हा प्रकार जिल्ह्याच्या प्रशासनात खीळ घालण्यासारखा आहे.
जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या रिक्त पदांची संख्या प्रचंड आहे. विशेष म्हणजे, अकोल्यातून बदली होणाºया अधिकाºयांच्या जागेवर कुणालाही दिले जात नाही. त्यामुळे काही अधिकाºयांची पदे वर्षानुवर्ष रिक्त ठेवण्याचा उपक्रमही सातत्याने शासनाकडून राबवला जात असल्याचेही पाहावयास मिळते.
काही दिवसांपूर्वी तेल्हारा, बाळापूर पंचायत समिती गटविकास अधिकाºयांची बदली झाली. त्यांच्या जागेवर इतर अधिकाºयाला पदस्थापना मिळालेली नाही. या दोन्ही पंचायत समित्या प्रभारींच्या खांद्यावर आहेत. त्यातच ग्रामविकास विभागाने ३ आॅगस्ट रोजीच्या आदेशाने ३५ अधिकाºयांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी एस.बी. भंडारे यांची कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी येथे, पातूरच्या गटविकास अधिकारी पी.एस. खोचरे यांची चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, अकोटचे गटविकास अधिकारी बी.एस. पाचपाटील यांची कोरपणा पंचायत समितीमध्ये बदली केली आहे. मूर्तिजापूरचे गटविकास अधिकारी अगर्ते यांचीही यापूर्वीच बदली झाली आहे. या सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची बदली केल्यानंतर त्या ठिकाणी एकही अधिकारी न देण्याचा उपक्रम शासनाकडून राबवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, लगतच्या काळात अकोल्याचे गटविकास अधिकारी राहुल शेळके यांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीनंतर त्यांचीही बदली होऊ शकते. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कारभार अधिकाºयांविना वाºयावर सोडला जाण्याची शक्यता या प्रकारातून स्पष्ट होत आहे. - जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.व्ही. गोहाड यांची बदली करण्यात आली. राज्यातील १५० पेक्षाही अधिक अधिकाºयांपैकी केवळ एकाला अकोल्यात देण्यात आले आहे.