प्राचार्यासह सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:40 AM2017-10-07T02:40:22+5:302017-10-07T02:40:36+5:30

मूर्तिजापूर : तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नियुक्त केलेले पाच कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित झाले नाही. या कारणावरून दाखल तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी वॉरंट बजावून स्थानिक गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्यासह सहा कर्मचार्‍यांना ६ ऑक्टोबर रोजी अटक केली. या घटनेने सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे.

Six people arrested with the Principal | प्राचार्यासह सहा जणांना अटक

प्राचार्यासह सहा जणांना अटक

Next
ठळक मुद्देनिवडणुकीच्या कामाला कर्मचारी न पाठविणे भोवले ! 

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नियुक्त केलेले पाच कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित झाले नाही. या कारणावरून दाखल तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी वॉरंट बजावून स्थानिक गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्यासह सहा कर्मचार्‍यांना ६ ऑक्टोबर रोजी अटक केली. या घटनेने सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही निवडणुकीची प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पाडण्याकरिता तालुक्यातून विविध कार्यालयांतील ८00 अधिकारी व कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. या निवडणुकीदरम्यान गाडगे महाराज महाविद्यालयातील १४ कर्मचार्‍यांना उपस्थित राहण्याचा आदेश निवडणूक अधिकार्‍यांनी दिला होता; परंतु निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात गाडगे महाराज महाविद्यालयातील पाच कर्मचारी वेळेवर हजर राहिले नाही. म्हणून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी राहुल तायडे यांनी नायब तहसीलदार डाबेराव यांना संबंधित महाविद्यालयात पाठवून प्राचार्याची भेट घेऊन आदेश दिलेल्या कर्मचार्‍यांना पाठविण्यास सांगितले. तरीही प्राचार्याने पाच कर्मचार्‍यांना न पाठविल्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी मूर्तिजापूर पोलीस स्टेशनमध्ये प्राचार्यासह सहा कर्मचार्‍यांविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. 
त्यावरून ठाणेदारांनी त्वरित कारवाई करून पीएसआय खंडेराव यांना वॉरंट घेऊन पाठवून प्राचार्यासह सहा कर्मचार्‍यांना अटक करून तहसील कार्यालयात नेले. या अटक केलेल्यांमध्ये प्राचार्य संतोष ठाकरे, प्रा. दिवाकर पवार, मुख्य लिपिक हरिभाऊ बोपटे, प्रा. दिलीप शहाडे, प्रा. अनिल ठाकरे, प्रा. सचिन मारोडे यांचा समावेश असून, त्यांना पुढील कारवाई करून वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे यांनी दिली आहे. 

Web Title: Six people arrested with the Principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.